चिमुकल्यांच्या कलागुणांनी रंगले स्नेहसंमेलन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:17 AM2021-04-01T04:17:41+5:302021-04-01T04:17:41+5:30
जळगाव : पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे बुधवारी ई-वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी स्नेहसंमेलनात ...
जळगाव : पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे बुधवारी ई-वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी स्नेहसंमेलनात रंगले भरले होते.
यावेळी शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सरस्वती मातेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने
स्नेहसंमेलनास सुरुवात झाली. समन्वयिका मेघना राजकोटीया यांनी प्रस्तावना मांडली. पोदार इंटरनेशनल स्कूलच्या प्रांगणातून हा कार्यक्रम सकाळी १० वाजेपासून युटयुब लिंक द्वारे संपूर्ण कार्याक्रामाचे थेट प्रक्षेपण विद्यार्थी व पालकांसाठी करण्यात आले. तसेच
गुगल मीटद्वारे पोदार स्कूलच्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यानी गणेश वंदना या सामूहिक नृत्याद्वारे कार्यक्रमाची सुरुवात केली.
नृत्याविष्कार,जादूचा खेळ,कोरोनावर आधारित नाटिका, देशभक्तीपर गीतगायन, मानव निर्मित पाऊस ध्वनी आदी कार्यक्रमांनी स्नेहसंमेलनात धम्माल उडविली. या स्नेहसंमेलनासाठी उपप्राचार्य रुपेश घाटगे, मुख्याध्यापिका उमा वाघ, दीपक भावसार,
हिरालाल गोराणे, जितेंद्र कापडे आदींनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन स्कूलच्या समन्वयिका अंकिता मुंदडा यांनी केले.