चाळीसगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट
By चुडामण.बोरसे | Published: November 26, 2023 08:43 PM2023-11-26T20:43:32+5:302023-11-26T20:43:47+5:30
चाळीसगाव (जि. जळगाव) : चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाड निकुंभ परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर गारपीट तसेच ...
चाळीसगाव (जि. जळगाव) : चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाड निकुंभ परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर गारपीट तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दुष्काळी परिस्थिती असताना थोड्याफार प्रमाणात असलेले कांदा व कापूस पिके यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तालुक्यात पिंपळवाड निकुंभ, नांद्रे, काकडणे, तळोंद्रे प्र. दे. आदी ठिकाणी सायंकाळी सहा ते पावणेसात वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. पिंपळवाड निकुंभ येथे सायंकाळी ६ वाजता पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान ३० मिनिटे गारपीट झाल्याने कपाशीसह कांदा व फळबागांचे नुकसान झाले आहे. नांद्रे, काकडणे, तळोंदे प्र. दे. व काकडणे येथेही वादळी वाऱ्यासोबत गारपीट झाली आहे.