तर जिल्ह्यात पुन्हा कन्टेनमेंट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:21 AM2021-02-17T04:21:55+5:302021-02-17T04:21:55+5:30
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले संकेत लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने ...
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले संकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे एकाच क्षेत्रात जर जास्त रुग्ण आढळले तर त्या परिसरात पुन्हा कंटेनमेंट झोन लावावे लागतील,अशी माहिती जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लोकमतशी बोलताना दिली.
गेल्या काही दिवसांपासून सातत्यने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात नागरिक बेफिकीर होऊन विनामास्क फिरतात. तसेच कोरोनाच्या बाबतीतील नियम पाळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जळगावसह काही जिल्ह्यांच्या टास्क फोर्सची बैठक घेतली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी राऊत यांनी टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत काही सुचना दिल्या.
राऊत यांनी सांगितले की, कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात एक रुग्ण जरी आढळला तरी तो परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केला जात होता. नंतरच्या काळात या नियमांमध्ये शिथीलता आली होती. आता पुन्हा जर एकात क्षेत्रात जास्त रुग्ण आढळले तर त्या भागात पुन्हा कंटेनमेंट झोन लावावे लागु शकतात. तसेच मास्कच्या नियमांचे कठोरपणे पालन करावे लागेल. त्याची जबाबदारी पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थेकडे त्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्यांनाही मास्क लावावा लागणार आहे.’