‘अब तक 56’ अल्पवयीन मुली ‘सैराट’

By admin | Published: July 9, 2017 11:29 AM2017-07-09T11:29:03+5:302017-07-09T11:29:03+5:30

चित्रपटांचे अनुकरण म्हणा किंवा शारीरिक आकर्षण यातून अल्पवयीन मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

'So far, 56' minor girls' 'Sarat' | ‘अब तक 56’ अल्पवयीन मुली ‘सैराट’

‘अब तक 56’ अल्पवयीन मुली ‘सैराट’

Next

 ऑनलाईन लोकमत / सुनील पाटील

जळगाव, दि.9 -  प्रेमात अडकलेल्या  शहरातील 56 अल्पवयीन मुली घरातून पळून गेल्या आहेत. ही आकडेवारी अवघ्या दीड वर्षाची आहे. चित्रपटांचे अनुकरण म्हणा किंवा शारीरिक आकर्षण यातून अल्पवयीन मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या घटनांमुळे पालकवर्ग मात्र कमालीचा चिंतेत आहे. या अल्पवयीन मुलींसोबत विवाहित महिलाही पतींना सोडून प्रियकरासोबत पळून गेल्याच्या काही घटना शहरात घडल्या आहेत.
तज्ज्ञांच्या मते गेल्या काही वर्षात माहिती-तंत्रज्ञानासोबत अनेक गोष्टी सहजतेने उपलब्ध होऊ लागल्या आहेत. प्रत्येकाच्या घरात टी.व्ही., इंटरनेट, मोबाईल उपलब्ध आहे. त्यामुळे मुलगा-मुलगी इंटरनेटवर व मोबाईलवर काय करताहेत हे पालकांना माहीत नसते, त्यामुळे इंटरनेट व मोबाईलचा अलिकडे चांगला वापर होण्याऐवजी गैरवापरच जास्त होऊ लागला आहे.
मुलांमध्ये अश्लील क्लिप पाहण्याचे प्रमाण अधिक
सायबर कॅफे व मोबाईल इंटरनेट सुविधेमुळे 17 ते 23 या वयोगटातील बहुतांश मुले अश्लील क्लिप पाहतात. काही जण दुकानातून या क्लिप डाऊनलोड करतात. त्यामुळे शारीरिक आकर्षण वाढून त्याचा विपरित परिणाम मुलांमध्ये दिसून येतो. गेल्या वर्षी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोलाणी मार्केटमधील सायबर कॅफेवर धाड टाकून कारवाया केल्या होत्या. तेव्हा अश्लील क्लिप डाऊनलोड करून देण्याचे प्रकार थांबले होते, आता मात्र हे प्रकार पुन्हा सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पोटच्या गोळ्याला सोडून विवाहिताही रफूचक्कर
शहरात अनेक घटनांमध्ये विवाहित महिला या पोटच्या मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेलेल्या आहेत. विवाहित महिलांच्या बाबतीत पोलीस स्टेशनला हरविल्याच्या नोंदी आहेत. या पाच महिन्यात 7 महिला प्रियकरासोबत रफूचक्कर झाल्या आहेत. पळून जाणारे जोडपे हे सर्वाधिक आंतरजातीय असल्याचे आढळून आले.
साडे पाच वर्षात 406 मुली व महिलांचे पलायन
2012 ते मे 2017 या साडे पाच वर्षाच्या कालावधित तब्बल406 मुली व महिलांनी प्रियकरासोबत पलायन केले आहे. पोलीस दप्तरीचा हा आकडा आहे. प्रत्यक्षात दाखल न झालेले अनेक प्रकरणे आहेत, त्यामुळे हा आकडा आणखी वाढू शकतो. दरम्यान, काही प्रकरणात कायद्याने सज्ञान असलेले जोडपे हे लगA करूनच पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत, तर मुलगी 18 वर्षाच्या आत असलेल्या प्रकरणात मुलाविरुध्द बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत.

Web Title: 'So far, 56' minor girls' 'Sarat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.