...तर एक मिनटही मंत्रीपदावर राहणार नाही गुलाबराव पाटील, कोविड काळात ३०० कोटीच्या घोटाळ्याचा आरोप

By सुनील पाटील | Published: April 23, 2023 08:01 PM2023-04-23T20:01:15+5:302023-04-23T20:01:23+5:30

संजय राऊत राजीनामा देतील का? उलटा चोर कोतवाल को डाटे असा हा प्रकार असल्याची टिका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

...So Gulabrao Patil will not stay on the post of minister even for a minute, accused of 300 crores scam during Kovid | ...तर एक मिनटही मंत्रीपदावर राहणार नाही गुलाबराव पाटील, कोविड काळात ३०० कोटीच्या घोटाळ्याचा आरोप

...तर एक मिनटही मंत्रीपदावर राहणार नाही गुलाबराव पाटील, कोविड काळात ३०० कोटीच्या घोटाळ्याचा आरोप

googlenewsNext

जळगाव : कोविड काळात आपण ३०० कोटीचा घोटाळा केला या आरोपात तथ्य नाही. तेव्हा उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री तर राजेश टोपे आरोग्य मंत्री होते. हा घोटाळा सिध्द झाला तर एक मिनिटही मंत्रीपदावर राहणार नाही, राजीनामा देईल. संजय राऊत राजीनामा देतील का? उलटा चोर कोतवाल को डाटे असा हा प्रकार असल्याची टिका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

गुलाबराव पाटील यांनी कोविड काळात ३०० कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी जळगाव दौऱ्यात केला. त्याचे कागदपत्रे आपल्याकडे असल्याचेही त्यांनी नमूद केले. या आरोपाचे खंडन करताना गुलाबराव पाटील यांनी त्यांनी राऊतांवर कठोर शब्दात टिका केली. कोविड काळात
१९० कोटी खर्च करण्याचे शासनाचे आदेश होते.

आम्ही १२१ कोटी खर्चाची मान्यता केली. त्यातील ९० कोटी वितरीत केले. त्यापैकी तीन वर्षात फक्त ८१ कोटी रुपये खर्च झाले, त्याचे कागदपत्रे माझ्याजवळ आहेत. असे असताना चारशे कोटीचा घोटाळा कसा होईल?. एका डोळ्याने आंधळ्या व्यक्तीने त्यांना माहिती पुरवली. संजय राऊत यांना माझे चॅलेंज आहे. एक महिन्यात, तीन महिन्यात केव्हाही चौकशी करा. यात एक रुपयाचाही भ्रष्टाचार निघाला तर एक मिनिटही मंत्री राहणार नाही. राजीनाम देईल, राऊत खासदारकीचा राजीनामा देतील का?, उलटा चोर कोतवाल को डाटे.. ते स्वत: जेलमध्ये जाऊन आले.

पुणे आणि ठाण्याचे काय व्यवहार केले, कसे केलेत. तुमचे व्याही कलेक्टर असताना काय उद्योग केले ते मला माहिती आहे. गुलाबराव पाटलांनी कोविड काळात काय काम केले जिल्ह्याला माहिती आहे. राऊत यांनी औकातीत रहावे, आमच्या तुकड्यावर मोठे झालेल्याने जास्त बोलू नये. आजकाल ते कोणावरही बोलतात. डेथ वॉरंट निघणार सांगतात. आदीत्य ठाकरेंचा समाचार घेताना ३५ वर्ष याच गुंडांनी शिवसेना मोठी केली. आदित्य जन्मालाही आलेले नव्हते. ज्या खडसेने भाजपची युती तोडली, तेच तुमच्या व्यासपीठावर बसले आहेत.

Web Title: ...So Gulabrao Patil will not stay on the post of minister even for a minute, accused of 300 crores scam during Kovid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.