सामाजिक घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 05:19 PM2020-04-24T17:19:30+5:302020-04-24T17:21:28+5:30

लॉकडाउनला महिना उलटला आहे. सामाजिक घडी विस्कटलेली दिसते.

The social clock ticked | सामाजिक घडी विस्कटली

सामाजिक घडी विस्कटली

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनला महिना झाल्यानंतरची स्थितीमाणसं माणसापासून दुरावली

मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : लॉकडाउनला महिना उलटला आहे. करोनाची लागण एका मनुष्यापासून दुसऱ्याला होते. कोरोनामुळे माणसं माणसांपासून दुरावली आहेत. सामाजिक घडी विस्कटलेली दिसते.
मीच माझा रक्षक म्हणून काळजी घेणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे या गोष्टी अत्यावश्यक आहेत. किंबहुना स्वत:सह इतरांनाही सुरक्षितता पाळणे गरजेचे आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडणे हेच यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मूळ मंत्र आहे. अशात महिन्याभरापासून लॉकडाउनमध्ये असलेली माणसे एकमेकापासून केव्हा दुरावली हे एकमेकांना कळलेच नाही. याचाच परिणाम सामाजिक जडणघडणीवर होतोे. सोशल डिस्टन्सिंग पाळता पाळता सोशल मीडियावर हे अघोषित समाज माध्यम बनले आहे. चांगले, वाईटवर खरे, खोटे याची पारख करण्याची मानसिकता कमी झाली असून लॉकडाउनचा परिणाम समाज मनावर अधिक गडद होत आहे.
लॉकडाउनला आज महिना पूर्ण झाला आहे. या काळात समाजातील अनेक बदलते स्थित्यंतरे अनुभवायला मिळत आहे. शतकानंतर आलेल्या महामारीचा अनुभव व त्याचे वर्णन आजची पिढी पुढील अनेक पिढ्यांना करेल. अगदी कारण अवस्थाच तशी झाली आहे. पहाटे काकडा आरतीपासून तर रात्री शतपावली करताना अथवा झोपण्यापूर्वी ही देवाचे दर्शन घेणारे भाविक आज आपल्या लाडक्या देवदर्शनापासून दूर झाली आहेत. सत्संग, वारी यात्रोत्सव बंद झाले आहे. मंदिरे दर्शनासाठी बंद झाली आहेत तर मशिदी नमाजासाठी बंद झाली आहे. असे कधी होईल हे स्वप्नातसुद्धा कोणी पाहिले नव्हते ते आज घडत आहे. लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या गेल्या. काहींचे लग्न तर लागले पण लग्नात कुटुंब सामील होऊ शकले नाही. कामगार आपल्या घरापासून शेकडो मैल अंतरावरील महानगरात अडकले आहे आणि त्याचे कुटुंबीय चिंतेत आहे. सामाजिक उपक्रम, मेळावे सांस्कृतिक कार्यक्रम अशा समाज सुधारण्यावादी उपक्रम सिनेमा, कौटुंबिक सहल, बाहेरचे जेवण, चार चौघातील गप्पागोष्टी मनाला आनंद देणाºया मित्रांची संगत, ज्येष्ठ नागरिकांच्या गावाच्या पारावरील बैठका, जावळापासून तर मानाचे पंगती, कौटुंबीक कार्यक्रम, मॉर्निग वाक, व्यायाम या गोष्टी हरवल्या आहेत. लॉकडाउनमुळे घराबाहेर पडता येत नाही आणि घरात करमत नाही. एकलकोंडा अवस्थेत माणसं आली आहेत. सामाजीक उपक्रमातून सलोखा धार्मिक उपक्रमातून मिळणारा अध्यात्मिक आनंद मिळेनासा झाला आहे. गरिबांचा रोजगार गेला आहे. दोन वेळच्या जेवणाची चिंता आहे. हातावर पोट असलेल्या मजुरांचे जीवन जगणे कठीण होत आहे. अगदी सामाजिक घडी विस्कटली आहे. लॉकडाउन संपण्याची सर्वच प्रतीक्षा करीत आहेत.

Web Title: The social clock ticked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.