वजन वाढविण्यासाठी कचऱ्यात भरली माती, ‘वॉटरग्रेस’ कर्मचाऱ्यांचा प्रताप

By सुनील पाटील | Published: April 19, 2023 06:22 PM2023-04-19T18:22:55+5:302023-04-19T18:27:27+5:30

वॉटरग्रेस कंपनीने शहरातील साफसफाईचा मक्ता घेतलेला आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी ओला व सुका कचरा संकलित केला जातो.

Soil filled with waste to increase weight, pride of 'Watergrace' employees in jalgaon | वजन वाढविण्यासाठी कचऱ्यात भरली माती, ‘वॉटरग्रेस’ कर्मचाऱ्यांचा प्रताप

वजन वाढविण्यासाठी कचऱ्यात भरली माती, ‘वॉटरग्रेस’ कर्मचाऱ्यांचा प्रताप

googlenewsNext

जळगाव : साफसफाईचा कचरा भरताना त्यात वजन वाढविण्यासाठी चक्क माती भरली जात असल्याचा प्रकार बुधवारी निवृत्ती नगरात उघडकीस आला आहे. वॉटरग्रेस कंपनीकडून जळगावकरांच्या पैशाची लूट होत आहे. या प्रकारानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख नीलेश पाटील यांनी मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या कानावर हा प्रकार घातला. भविष्यात असा प्रकार झाला तर मक्तेदाराला काळे फासण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, संबंधित मक्तेदाराला पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

वॉटरग्रेस कंपनीने शहरातील साफसफाईचा मक्ता घेतलेला आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी ओला व सुका कचरा संकलित केला जातो. त्याशिवाय कॉलनी व गल्ल्यांमध्ये उघड्यावर असलेला कचरा संकलित करुन तो शहराच्या बाहेर टाकला जातो. कचऱ्याच्या एकूण वजनावर कंपनीला मोबदला अदा केला जातो. वॉटरग्रेस कंपनी व महापालिका यांच्यात कचऱ्याचा करार झालेला आहे. एका टनासाठी ९७० रुपये असा मोबदला देण्यात येतो. शहरातून एका दिवसाला ३१० टनापेक्षा जास्त कचरा संकलित होत असल्याचे दाखविले जाते. कचऱ्यात माती भरुन वजन वाढविले जात असेल तर खरोखर कचरा किती असू शकतो, याचा अंदाज येतो. कचऱ्याच्या नावाने माती भरण्याचे उद्योग करुन एक प्रकारे जनतेच्या पैशाची लूट होत आहे.शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख नीलेश पाटील यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन महापालिकेने करारनाम्यातील अटीशर्तीचे उल्लंघन केले म्हणून कंत्राटदारला जागेवरच पाच हजार रुपयांचा दंड केला आहे. त्याशिवाय गुरुवारी कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी ‘लोकमत’ ला दिली.

 

Web Title: Soil filled with waste to increase weight, pride of 'Watergrace' employees in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव