माती परीक्षणामुळे शेतीचे आधुनिकीकरण करता येईल-गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 06:46 PM2021-09-20T18:46:37+5:302021-09-20T18:50:19+5:30

अमळनेर बाजार समितीच्या पातोंडा येथे पेट्रोल पंप भूमिपूजन आणि माती परीक्षण यंत्राचे भूमिपूजन

Soil testing can modernize agriculture: Gulabrao Patil | माती परीक्षणामुळे शेतीचे आधुनिकीकरण करता येईल-गुलाबराव पाटील

माती परीक्षणामुळे शेतीचे आधुनिकीकरण करता येईल-गुलाबराव पाटील

googlenewsNext


संजय पाटील

अमळनेर : शेतकरी भिकारी नाही, तो दान करणारा आहे. त्याच्यात सहन करण्याची क्षमता आहे. माती परीक्षण म्हणजे माणसाच्या शरीराची चाचणी करण्यासारखे आहे. त्यामुळे शेतीचे आधुनिकीकरण करता येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पातोंडा येथील पेट्रोलपंप भूमिपूजन व माती परीक्षण यंत्राच्या उदघाटनप्रसंगी केले.

यावेळी त्यांनी जिल्ह्यात ५०० कोटींच्या पाणीपुरवठा योजना आणून थेट जनतेपर्यंत पिण्याचे पाणी पोहचविणार असल्याचेही सांगितले.

गुलाबराव पुढे म्हणाले की, बाजार समितीच्या मुख्य प्रशासक महिला असल्या तरी त्यांची कामे शेतकरी हिताची आहेत. आमदार अनिल पाटील यांनी पातोंडा, मठगव्हान, रुंधाटी, गंगापुरी, मुंगसे, दापोरी परिसरातील हजारो एकर शेतीतील वर्षानुवर्षाची पाण्याचा निचरा न होण्याची समस्या सांगून त्यावर विशेष योजना तयार करण्याची विनंती केली.

विशेष टोपी
माजी आमदार साहेबराव पाटील यांनी २०१७ पासूनच्या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीचा शेतकऱ्यांचा प्रलंबित मोबदला गुलाबरावानी आणून दिल्याबद्दल त्यांचा विशेष टोपी घालून सत्कार केला.

माजी आमदार दिलीप सोनवणे, इंडियन ऑईलचे अश्विन यादव, ए.जी. ट्रान्स.चे एम. डी. अजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील यांनी प्रास्ताविकात अवघ्या काही महिन्यात बाजार समितीत सुरू होत असलेल्या शेतकरी हिताच्या नवनवीन योजनांची माहिती दिली.

व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख पाटील, बाजार समितीचे प्रशासक प्रा. सुरेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख विजय पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील, संभाजी पाटील, जितेंद्र राजपूत, एल. टी. पाटील, भाईदास अहिरे, पातोंडयाचे भरत बिरारी , जीनमालक केदार पवार, बाजार समितीचे माजी संचालक हरी भिका वाणी, निवृत्त अपर पोलीस अधीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी उपस्थित होते.

विशेष सत्कार
बाजार समितीची हायटेक यंत्रणा राबवून आयएसओ मानांकन मिळवल्याबद्दल केशवा व्हिजनचे संचालक गणेश भामरे तसेच बाजार समितीचे प्रकल्पांचे कामकाज व्यवस्थित हाताळून यश मिळवणारे लिपिक बापू पाटील व गणेश पाटील यांचा पालकमंत्र्याच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, अनिल शिसोदे, जिल्हा किसान सेलचे अध्यक्ष सुरेश पाटील, विक्रांत पाटील , मनोज पाटील, पं. स. सदस्य विनोद जाधव, भागवत पाटील, रिटा बाविस्कर, कविता पवार, आशा चावरीया, अलका पवार, योजना पाटील हजर होते. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.

Web Title: Soil testing can modernize agriculture: Gulabrao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.