सोलर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 09:54 PM2019-03-08T21:54:19+5:302019-03-08T21:56:39+5:30
सोलर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांनी ८ रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
चाळीसगाव, जि.जळगाव : सोलर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांनी ८ रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. लोकशाही मार्गाने न्याय न मिळाल्यास आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकून राजकीय नेत्यांना गावबंदीचा इशारा देण्यात आला.
बोढरे, शिवापूर शिवारात सुमारे १२०० एकर शेतजमिनी सोलर कंपन्यांनी लाटल्याप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करूनही न्याय मिळत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी सत्तेचा दुरूपयोग करून या बेकायदेशीर सोलर कंपन्यांना पाठीशी घालताहेत, असा आरोप पीडित शेतकऱ्यांनी केला आहे.
महसूल राज्यमंत्र्यांकडे चौकशी अहवाल पाठवून वेळीच आम्हा पीडितांना न्याय नाही मिळाला तर निवडणुकांवर बहीष्कार तर राहील तसेच राजकीय नेत्यांना गावात फिरकू देणार नाही, असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी जाहीर पाठिंबा देऊन किसनराव जोर्वेकर यांनी सांगितले की, शेतकºयां ही वेळ यावी हे मोठे दुर्दैव आहे. लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असून कंपनीला पाठिशी घालताहेत. निवडणुकांंवर बहिष्कार घालण्याची वेळ तालुक्यातील शेतकºयांवर यावी हे लोकशाहीसाठी घातक आहे.