पोलीस कोविड हेल्पलाईनद्वारे समस्याचे निराकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:15 AM2021-03-21T04:15:49+5:302021-03-21T04:15:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढलाय. यात नागरिकांसह पोलीसांच्या कोरोना संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी व तात्काळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढलाय. यात नागरिकांसह पोलीसांच्या कोरोना संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी व तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस कोविड हेल्पलाईन जिल्हा पोलीस दलात कार्यान्वित करण्यात आली आहे. शंभर क्रमांकावर कॉल केल्यानंतर नागरिकांना पोलिसांकडून मदतीचा हात दिला जात आहे.
दरम्यान, कोरोना सेल विभागही पोलीस दलाच्यावतीने सुरू करण्यात आला आहे. या विभागाद्वारे सर्व पोलीस ठाण्यांचा एकत्र व्हॉटसॲप ग्रृप बनविण्यात आला आहे. या ग्रृपच्या माध्यमातून दररोज प्रत्येक पोलीस ठाण्यात आढळून येणारे बाधित पोलीस कर्मचार्यांची माहिती जाणून घेतली जाते. कुठे उपचारार्थ दाखल केले, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचीही माहिती गोळा जाते. त्यासोबत बाधित पोलीस कर्मचार्यांच्या प्रकृतीची विचारणा केली जाते. आवश्यक असल्यास तातडीने मदतही पोहचविली जाते. तसेच पोलीस हेल्पलाईनवर नागरिकांना कोरोना संदर्भात योग्य मार्गदर्शन करून तातडीने रूग्णवाहिका सुध्दा उपलब्ध करून दिली जाते. याचा असंख्य नागरिकांना लाभ मिळून वेळेवर उपचार मिळाले असल्याची माहिती पोलीस दलाकडून देण्यात आली आहे.