काहींना बोट धरून मोठे केले, अनेक जण विसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2017 12:49 AM2017-02-26T00:49:00+5:302017-02-26T00:49:00+5:30

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी चिमटे घेत जोरदार फटकेबाजी केली.

Some have been picked up by boat, many have forgotten | काहींना बोट धरून मोठे केले, अनेक जण विसरले

काहींना बोट धरून मोठे केले, अनेक जण विसरले

Next

जळगाव : जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी गिरीश महाजन व मी देखील फार वेळ देऊ शकलो नाही. उदय वाघ यांनी यश मिळविले. ज्यांनी यश दिले ती जनता व कार्यकर्त्यांना विसरू नका त्यांची जाण ठेवा.   काही नवीन आले त्यांना येथील संस्काराने बोट धरून मोठे केले, ते मोठे झाले याचा आनंद आहे. अनेक जण विसरत चाललेत.  किशोर काळकरांचा संपर्क नसतो,  अशा शब्दात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी चिमटे घेत जोरदार फटकेबाजी केली.
भाजपा जिल्हा कार्यालयात पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्काराचा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता.  पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, , खासदार ए.टी. पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार स्मिता वाघ, आमदार उन्मेश पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, बेटी बचाव अभियानाचे राष्टÑीय समन्वयक डॉ. राजेंद्र फडके, सह संघटन मंत्री किशोर काळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
 या जिल्ह्यात २/३ संस्था ताब्यात आहेत. हे अनेक वर्षातील लढ्याचे, कष्टाचे फळ आहे. १९८० च्या कालखंडात पक्ष शून्य होता. दोन सदस्य पंचायत समितीचे व एक जिल्हा परिषदेत होता. पण कार्यकर्त्यांच्या बळावर ताकद वाढत गेली.  अनेक विरोध सहन करत ही ताकद वाढली.
 ३३ सदस्य निवडून आले, पण आकडा ३४ चा
खडसे म्हणाले, नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत  गिरीश महाजन व्यस्त होते त्यामुळे ते व मीदेखील फारसा वेळ जिल्ह्यात देऊ शकलो नाही.
उदय बापूंचे नेतृत्व निवडणुकीत होते. बºयाच गोष्टी या मलाही माहित नसतात. ३३ सदस्य निवडून आले पण आकडा ३४ झाला हे देखील मला माहित नव्हते.
पक्षाने स्वबळावर ३३ जागांवर यश मिळविले. सत्ता ही आमचीच असेल. ३४ चा आकडाही आम्ही पूर्ण केला असल्याचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ प्रास्ताविकात म्हणाले. २०१२ मध्ये पक्षाला ३ लाख ३० हजाराचे मताधिक्य होते ते यावेळी ५ लाख ५० हजारावर गेले आहे. संघटन, नियोजन व विकास हे ध्येय असल्याचेही ते म्हणाले.
सदस्यांचा सत्कार
यावेळी जिल्हा परिषदेत नव्याने निवडून आलेल्या ३३ सदस्यांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
 गट स्थापन करू         - जलसंपदामंत्री
४० पेक्षा जास्त यश मिळवायचा आपला संकल्प होता पण तो पूर्ण करता आला नाही याचे शल्य असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले. येत्या दोन दिवसात पक्षाचा गट स्थापन करायचा आहे, त्या दृष्टीने तयार रहा. पूर्ण बहुमत मिळाले असते तर अधिक आनंद झाला असता. मिळालेले यश कार्यकर्त्याच्या जोरावर असल्याने त्यांचे अभिनंदनही महाजन यांनी केले.

उतू नका मातू नका-चंद्रकांत पाटील
कोणाचीही मदत न घेता, युती न करता पक्षाला या जिल्ह्णात यश मिळाले. अनेकांच्या ताकदीने ते मिळाले आहे.  पण एक धोका असतो. यश मिळाले ते डोक्यात जाऊ देऊ नका. उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले. केंद्र व राज्याच्या अनेक योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवून खूप काम करा, असेही ते यावेळी म्हणाले.

Web Title: Some have been picked up by boat, many have forgotten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.