खान्देशातील काही ज्ञात, काही अज्ञात संत-महंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 04:22 PM2017-11-29T16:22:04+5:302017-11-29T16:24:48+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये साहित्यिक प्रा.डॉ.विश्वास पाटील यांचा विशेष लेख.

Some known fishermen, some unknown saints - Mahant | खान्देशातील काही ज्ञात, काही अज्ञात संत-महंत

खान्देशातील काही ज्ञात, काही अज्ञात संत-महंत

googlenewsNext

श्री दासगणू विरचित श्री भक्तीसारामृत ग्रंथातूनही खान्देशच्या संत परंपरेचा एक धागा उलगडताना दिसतो. औरंगाबाद नजीकच्या अवणे शिवणे गावात गोपजींच्या वंशातले बापूजीपंत पिता व उमाबाई माता यांचे चिरंजीव दादा महाराज यांचा प्रवास खान्देशात झाला होता. दादांचे मूळचे नाव विठ्ठल. हे पारोळा, बोदवड येथे आले होते. ते सिन्नरलाही आले होते. धुळ्याजवळच्या डोंगराळ गावी परमानंद आणि लालमती हे सदाचरणी दाम्पत्य राहात होते. या राजपूत परिवारात पौष वद्य चतुर्थी 1760 साली टीकारामजींचा जन्म झाला. त्यांनी खूप लांबवरची यात्रा केली. उग्र तपाचरण केले. अनेक साधू संतांशी संवाद साधला. तापी काठावर त्यांना नाथ पंथात दीक्षा मिळाली. धुळे, पारोळा येथे त्यांचे वास्तव्य होते. संत टीकाराम यांची शिष्य परंपरा संप्रदायमुक्त असल्यामुळे त्यांचे गुल मोहम्मद, त्रिंबकराव कन्नडकर, वामनराव आवराढकर, वेरुळचे बाबा अग्नीहोत्री हे सत्पुरुष शिष्य होते. संत टीकाराम यांनी विपुल ग्रंथलेखन केले. पुढे त्यांच्या गादीवर लक्ष्मणसिंह यांचे पुत्र मेघराजनाथ गंगारामनाथ बसले. चैत्र शुद्ध द्वादशी शनिवारी प्रदोष काळी 1845 साली त्यांचे निर्वाण झाले. नगर जिल्हय़ातल्या भाम पाटोदे नामक नगरीत गोदावरीच्या तटावर वज्रा नदीकाठी विठ्ठलपंत, रुख्मिणी हे दाम्पत्य राहात होते. त्यांच्या वंशातली गंगाधररावांची मुले जळगाव जामोद येथे वाढली. पुढे पांडुरंग दीनानाथ इथेच वास्तव्याला होते. माहूर गडावर नारायण नामक एक कण्वशाखीय ब्राrाण गृहस्थ होते. त्यांच्या परिवारातले हरिदास नर्मदा काठावरून प्रदक्षिणा करून खंडवा येथून रावेरला आले होते. ब:हाणपूर येथून ते रावेरला आले. खरे तर ते श्री वालचंद शेठजींच्या प्रयत्नामुळे यावलला आले. पुढे त्यांच्या परंपरेतले नानाबुवा खंडवा येथे गादीवर विराजमान झाले. यांच्या प्रयत्नांमुळे रावेर येथे एका नव्या भागवत धर्माची गुढी उभारली गेली होती. इसवी सन 1300 सालची ही घटना आहे. रावेर येथे बारी समाजाचे श्री आवजी सिद्ध महाराजांचा जन्म झाला. पिता महादेव, माता पार्वती. महाराज सूरदारांप्रमाणे जन्मत:च प्रज्ञाचक्षू होते. बालपणी माता-पिता निवर्तले. मावशीने पालनपोषण केले. मावशीकडे सुनगावसाठी प्रस्थान करताना महाराजांनी आपली नेत्रव्यथा आणि एकूणच जीवनातील व्यथा सांगितली. मार्गात बंभाडा येथे श्री कोथलकर परिवारात विश्राम केला. मावशी लेकराला शिवमहात्म्य सांगत होती. माघ महिना होता. महादेवाच्या दर्शनाला दिंडी निघाली होती. आवजीने मावशीला दिंडी कुठे आणि का निघाली आहे, असे विचारले असता मावशीने सारी कथा निवेदिली. आपले जीवन महादेवाप्रती समर्पित करण्याच्या भावनेने महाराज प्रेरित झाले. सालबर्डीच्या गुंफेत महाराजांनी दिंडीसोबत शिवप्रतिमेचे दर्शन घ्यायचे ठरवले. नेत्रहीन असल्यामुळे शिवदर्शन होणे तर काही शक्य नव्हते. आपण शिवदर्शनाला असमर्थ आहोत, असे वाटून महाराजांनी दरीत उडी ठोकली. माता पार्वतीने त्याना वरचेवर ङोलून घेतले. प्रत्यक्ष दर्शन दिले. महाराज तृप्त झाले. आपणास नेत्रज्योती प्राप्त व्हावी, अशी इच्छा प्रदर्शित केली असता त्यांचे जीवन पालटले. महाराजांना जगदंबेने आदेश दिला की आता त्यांनी गृहस्थधर्माचे आचरण करावे पण महाराजांनी परत दरीत उडी मारली असता महादेवाने त्यांना गृहस्थ धर्माचे पालन करायचा सल्ला दिला पण महाराजांनी आपले जीवन शिवचरणी समर्पित करायचा निश्चय केला होता. मावशी वाट बघत राहिली. मावशीला स्वप्नदर्शन झाले आणि सारी कथा कळली. गाडगे महाराजांच्या परंपरेत बारी समाजातल्या रुपलाल महाराजांचे नाव येते. संत रुपलाल महाराज पहूरचे निवासी होते. जळगाव जामोद येथे 1937 साली 21 दिवस निराहार राहून त्यांनी नामसप्ताह आयोजित केला होता. त्यांनी एका धर्मशाळेची निर्मिती केली. या कार्यक्रमासाठी गाडगे बाबा यांच्यासमवेत संत मंडळ उपस्थित होते. पुढे महाराज आकोट येथे गेले. आकोटचा समारंभ पूर्ण झाल्यावर हिमालयात 12 वर्षे तपसाधना केली. 1971 साली महाराज अंजनगाव सुर्जी येथे आले. तिथे सन 1976 साली एका विठ्ठल मंदिराची उभारणी केली. पंढरपूर येथेही धर्मशाळा उभारली. 17 एप्रिल 1994 साली महाराजांनी देह ठेवला. त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आजही अंजनगाव सुर्जी व जळगाव जामोद येथे चैत्र शुध्द पंचमी दिनी साजरा होतो.

Web Title: Some known fishermen, some unknown saints - Mahant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.