भादली रेल्वेस्थानकावर तिसरी रेल्वे लाईन जोडणीसाठी काही गाड्या रद्द तर काहींच्या मार्गात परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 07:39 PM2018-09-04T19:39:44+5:302018-09-04T19:40:07+5:30

बदलाची नोंद घेऊन नियोजन करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन

Some trains will be canceled for connecting the third railway line at Bhadli railway station, while some are changed in some way | भादली रेल्वेस्थानकावर तिसरी रेल्वे लाईन जोडणीसाठी काही गाड्या रद्द तर काहींच्या मार्गात परिवर्तन

भादली रेल्वेस्थानकावर तिसरी रेल्वे लाईन जोडणीसाठी काही गाड्या रद्द तर काहींच्या मार्गात परिवर्तन

Next

भुसावळ, जि.जळगाव : मध्यरेल्वेच्याभुसावळ विभागातील भादली रेल्वेस्थानकावर तिसरे रेल्वे लाईन जोडणी तथा स्थानकावर प्रि-नॉन इंटरलॉकिंग व रिमोल्डिंगचे कार्य सुरू होणार असल्याने ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या असून तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
भुसावळ विभागातील भादली स्थानकावर तिसरी रेल्वे लाईन अंथरण्याचे व जोडणीचे काम सुरू आहे. भादली स्टेशन यार्डात रिमोल्डिंगचे कार्य तसेच पि-नॉन इंटरलॉकिंगमुळे भुसावळ स्थानकावरून सुटणाऱ्या काही पॅसेंजर गाड्या ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान रद्द करण्यात आलेले आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या अशा
गाडी क्रमांक ५९०१३ सुरत-भुसावल पॅसेंजर ही गाडी ५ ते ८ दरम्यान, तर परतीच्या ५९०१४ प्रवासात ६ ते ९ दरम्यान रद्द करण्यात आलेली आहे.
गाडी क्रमांक ५९०८९ भुसावळ - सुरत पॅसेंजर ही गाडी ६ ते ९ व परतीच्या प्रवासात ५ ते ८ सप्टेंबर दरम्यान रद्द करण्यात आलेली आहे. गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ-सुरत पॅसेंजर ६ ते १० व गाडी क्रमांक ५९०७५ सूरत- भुसावल पॅसेंजर ५ ते ९. गाडी क्रमांक ५११८२ भुसावळ- देवळाली पॅसेंजर ५ ते ९ व परतीच्या प्रवासात ६ ते १०
गाडी क्रमांक ५११५४ भुसावळ- मुंबई पॅसेंजर ६ ते ९ परतीच्या प्रवासात ६ ते १० दरम्यान रद्द करण्यात आलेली आहे.
या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर- गोंदिया ही गाडी ८ रोजी , क्रमांक ११०४० ही गाडी ९ रोजी प्रारंभीच्या स्थानकांवरून त्यांच्या मार्गात बदल करण्यात आलेले आहे दौंड, अहमदनगर, मनमाड जळगावकडे न येता पूर्णा, अकोलामार्गे वळविण्यात आलेली आहे. तसेच परतीच्या प्रवासातही अकोलावरून भुसावळकडे न येता पूर्णा, मनमाड, अहमदनगर, दौंड अशी जाणार आहे.
गाडी क्रमांक १५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनल गोरखपूर काशी एक्सप्रेस ही गाडी प्रारंभिक स्थानकापासून ९ सप्टेंबरला सुटणार आहे. मनमाड, पूर्णा, अकोला, वरणगाव, दुसखेडा मार्गे तर गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनल- काशी एक्सप्रेस दुसखेडा, वरणगावमार्गे अकोला, पूर्णा, मनमाड.
गाडी क्रमांक १२८३३ अहमदाबाद -हावडा एक्सप्रेस ही गाडी अमदाबादवरून ९ ला सुटणार असून गोदरा, नालदा, उज्जैन, भोपाल, इटारसी, नागपुर तर ७ सप्टेंबर रोजी हावडा वरून सुटणार असून याच्या मार्गात असा राहील नागपूर, इटारसी, भोपाल, उज्जैन, गोधरा..
गाडी क्रमांक २२१२९ लोकमान्य टिळक टर्मिनल- इलाहाबाद एक्सप्रेस ही गाडी मुंबईवरून ९ ला सुटणार असून मनमाड, पूर्णा, अकोला, वरणगाव, खंडवा तर गाडी क्रमांक १२१६६ वाराणसी लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस ८ रोजी वाराणसीवरून सुटेल व खंडवा, वरणगाव, अकोला, पूर्णा, मनमाड या मार्गावरून जाणार आहे.
या गाड्यांच्या मार्गात बदल तसेच रद्द झालेल्या गाड्यांच्या नोंद प्रवाशांनी घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Some trains will be canceled for connecting the third railway line at Bhadli railway station, while some are changed in some way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.