मुलगा अमेरिकत, घरात एकट्या पित्याची आत्महत्या
By विजय.सैतवाल | Published: September 26, 2023 07:58 PM2023-09-26T19:58:56+5:302023-09-26T19:59:20+5:30
आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : पत्नीचे निधन झालेले व मुलगा अमेरिकेत असल्याने घरात एकटेच राहत असलेल्या सोपान जगन्नाथ ढाके (७५, रा. कासमवाडी) यांनी मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
कासमवाडीमधील उर्दू शाळेच्या बाजूला राहणारे सोपान ढाके यांच्या पत्नीचे निधन झालेले असून त्यांचा एकुलता एक मुलगा सध्या अमेरिकेत राहतो. त्यामुळे ढाके हे घरी एकटेच राहत होते. मंगळवारी दुपारी त्यांनी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब शेजारच्या मंडळींच्या लक्षात आली व त्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्या वेळी पोकॉ छगन तायडे, विशाल कोळी, जमील शेख, रतीलाल पवार हे घटनास्थळी पोहचले. त्या वेळी त्यांनी मयताच्या नातेवाईकांची माहिती काढून त्यांना या विषयी कळविले. नातेवाईक आल्यानंतर ढाके यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.