मुलगा घरी आला अन् दिसला वडीलांचा मृतदेह, कांचन नगरामध्ये रिक्षा चालकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 07:18 PM2023-03-22T19:18:23+5:302023-03-22T19:22:30+5:30
कांचन नगर येथे दत्तू चौधरी हे पत्नी, मुलगी व मुलासह वास्तव्यास होते.
सागर दुबे
जळगाव : कांचन नगर येथे ४८ वर्षीय रिक्षा चालकाने राहत्या घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. दत्तु नामदेव चौधरी असे मृत रिक्षा चालकाचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कांचन नगर येथे दत्तू चौधरी हे पत्नी, मुलगी व मुलासह वास्तव्यास होते. रिक्षा चालवून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचे. बुधवारी सकाळी पत्नी मुलीला घेवून केटरिंगच्या कामाला निघून गेल्यामुळे चौधरी हे मुलासह घरी होते. काही वेळानंतर मुलगाही बाहेर गेल्यानंतर त्यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुलगा घरी परतल्यावर त्याला वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर त्याने मनहेलवणारा आक्रोश केला. त्यानंतर चौधरी यांना खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजून आलेले नसून याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.