सासऱ्याच्या पैशावर ‘जमाई राजा’ला हवा शेजारचा प्लॉट, पैशासाठी विवाहितेचा छळ
By विजय.सैतवाल | Published: October 22, 2023 04:24 PM2023-10-22T16:24:27+5:302023-10-22T16:24:51+5:30
सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा
जळगाव : घराशेजारी असलेला प्लॉट घेण्यासाठी माहेराहून पैसे न आणल्याने सना परवीन रईस शहा या विवाहितेला सासरच्या मंडळींनी मारहाण करीत तिचा छळ करण्यासह जीवेठार मारण्याची धमकी दिलीय याप्रकरणी शनिवार, २१ ऑक्टोबर रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद येथील माहेर असलेल्या सना परवीन रईस शहा याचा विवाह चाळीसगाव शहरातील रईस शहा कादर शहा यांच्याशी झाला. लग्नानंतर सुरूवातीचे सहा महिने विवाहितेला सासरच्या मंडळींनी चांगली वागवणूक दिली. त्यानंतर तिला किरकोळ कारणावरून टोमणे मारणे सुरू केले. त्यांच्या घराच्या शेजारी विक्रीला असलेला प्लॉट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी विवाहितेकडे करण्यात आली. पैसे न आणल्याने विवाहितेला मारहाण, शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली.
या प्रकरणी विवाहितेने शनिवार, २१ ऑक्टोबर रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन पती रईस शहा कादर शहा, सासू सायराबी कादर शहा (५५), नणंद शमिनाबी कादर शहा (२३) व दीर (सर्व रा. चाळीसगाव) यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार हरिष पाटील करीत आहेत.