सोनसाखळी चोर झाले पोलिसांवर शिरजोर!

By admin | Published: September 16, 2015 12:22 AM2015-09-16T00:22:41+5:302015-09-16T00:22:41+5:30

धुळे : पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीची सलग दुसरी घटना घडल्याने चोरटे पोलिसांवर शिरजोर झाल्याचा प्रत्यय येत आहे.

Sonasakhal thieves became a police force! | सोनसाखळी चोर झाले पोलिसांवर शिरजोर!

सोनसाखळी चोर झाले पोलिसांवर शिरजोर!

Next

धुळे : पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीची सलग दुसरी घटना घडल्याने चोरटे पोलिसांवर शिरजोर झाल्याचा प्रत्यय येत आहे. चोरीची घटना घडल्यानंतरही पोलिसांकडून घटनेची नोंद नाही. डीबी पथक चौकशीसाठी गेले आहे, साहेब नाहीत, अशी बेजबाबदार उत्तरे दिली जात आहेत. भरदिवसा महिलांच्या गळ्यातून सोनसाखळ्या ओरबडल्या जात असल्याने शहरात कायदा व सुव्यवस्था ढासळल्याची स्थिती आहे.

शहरातील तुळशीरामनगरात सोनसाखळी चोरीची घटना दुपारी 12 वाजता घडल्यानंतर नियंत्रण कक्षात वायरलेसवरून माहिती कळविण्यात आली होती. परंतु पश्चिम देवपूर पोलिसांकडून या घटनेची माहिती उशिरार्पयत माध्यम प्रतिनिधींना देण्यात आली नाही.

तात्पुरते सोपस्कार..

आठ दिवसांपूर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीची घटना घडल्यानंतरही पश्चिम देवपूर पोलिसांनी गस्त वाढवली नाही. संशयास्पदरीत्या फिरणा:या वाहनांची चौकशी केली नाही, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. घटना घडल्यानंतर नेहमीप्रमाणे तात्पुरती नाकेबंदी, परिसरात शोध मोहीम राबविण्याचा सोपस्कार पोलिसांनी पार पाडला. मात्र चोरटे मिळून आले नाहीत.

Web Title: Sonasakhal thieves became a police force!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.