सोनवणे कुटुंबाची तिसरी पिढी जपतेय वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 03:56 PM2018-12-17T15:56:29+5:302018-12-17T15:56:34+5:30

आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे हे त्यांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व राजकीय, सामाजिक क्षेत्रात करीत आहे.

Sonawane family's third generation Japaate legacy | सोनवणे कुटुंबाची तिसरी पिढी जपतेय वारसा

सोनवणे कुटुंबाची तिसरी पिढी जपतेय वारसा

Next

सुशील देवकर
जळगाव : सोनवणे कुटुंबीय आणि राजकारण हे जणू समीकरणच बनले आहे. गेल्या ६४ वर्षांपासून या कुटुंबातील सर्वच प्रमुख सदस्य राजकारणात आहेत. सरपंचपदापासून विधानसभेपर्यंतच्या निवडणुका या कुटुंबाने लढविल्या आहेत. आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे हे त्यांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व राजकीय, सामाजिक क्षेत्रात करीत आहे.
५९ वर्षांपासून सरपंचपद
जळगाव तालुक्यातील सुजदे-भोलाणे हे मूळ गाव असलेल्या या कुटुंबातील तोताराम आवसू सोनवणे यांनी १९५४ ते १९७० या कालावधीत गावचे सरपंचपद भूषविले. त्यांच्या पश्चात त्यांचे द्वितीय चिरंजीव पंडित तोताराम सोनवणे यांनी १९७१ ते १९७५ या कालावधीत, त्यानंतर मुरलीधर तोताराम सोनवणे यांनी १९७६ ते १९८५, वसंत तोताराम सोनवणे यांनी १८८६ ते १९९० या कालावधीत, सिंधू मुरलीधर सोनवणे यांनी १९९० ते १९९५ या कालावधीत, सुनील मुरलीधर सोनवणे यांनी १९९५ ते २००० या कालावधीत, अभिमन्यू सिताराम सोनवणे यांनी २००० ते २००५ या कालावधीत सरपंचपद भूषविले. गेल्या काही वर्षांपासून या कुटुंबातील सुनांकडे हे सरपंचपद आहे. मधली केवळ पाच वर्ष सरपंचपद कुटुंबाबाहेर होते.
सोनवणे कुटुंबाने सिताराम तोताराम सोनवणे यांच्या रूपात १९५५ मध्ये जि.प.मध्येही स्थान मिळविले. तत्कालीन ममुराबाद-म्हसावद गटातून ते जि.प. सदस्यपदी निवडून आले होते. पुढील टर्मला त्यांनी जळगाव पं.स.समितीची निवडणूक लढविली. त्यात ते विजयी झाले. एवढेच नव्हे तर पंचायत समितीच्या सभापतीपदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली. याच काळात ते जिल्हा बँकेवर तसेच शेतकी संघावरही संचालक होते. १९६५ पासून ते जळगाव कृउबाचे सभापती झाले. सलग १४ वर्षे ते कृउबाचे सभापती होते. त्या काळी कृउबा समितीचे कार्यालय सध्याच्या व.वा.गोलाणी मार्केटच्या जागेवर होते. सिताराम सोनवणे यांच्या प्रयत्नानेच कृउबाला अजिंठा रोडवरील जागा मिळाली. इमारतीचे बांधकाम होऊन त्यांच्या कार्यकाळातच कृउबा या नविन जागेत स्थलांतरीत झाली. आमदार सोनवणे यांचे बंधू शामकांत सोनवणे यांनी तीन वेळा नगरसेवकपद भूषविले असून त्यांच्या पत्नी राखी शामकांत सोनवणे यांनीही नगरसेवकपद तसेच महापौर, उपमहापौरपद भूषविले आहे. आमदार सोनवणे यांचे चुलत बंधू डॉ.अश्विन सोनवणे हे सध्या उपमहापौर आहेत.
तिसºया पिढीने गाठले शिखर
बळीरामदादा यांचे चिरंजीव प्रा.चंद्रकांत सोनवणे यांना समाजकारणाचे व राजकारणाचे बाळकडू घरातून मिळाले. समाजाचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशानेच ते समाजकार्याकडे व राजकारणाकडे वळले. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी विद्यार्थी नेता म्हणून लौकिक मिळविला. १९८२ मध्ये पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी सचिव पदाची निवडणूकही लढविली. तसेच कॉलेजला असतानाच १९८५ मध्ये नगरसेवकपदाची निवडणूकही लढविली. १९९१ मध्ये ते नगरसेवक म्हणूनही निवडून आले. तसेच नूतन मराठा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही रूजू झाले. त्यानंतर ते तीन टर्म नगरसेवक होते. तत्कालीन आमदार सुरेशदादा जैन यांच्याविरोधात जळगावातून दोन निवडणुका लढविल्या. मात्र पराभूत झाले. २०१४ मध्ये मात्र चोपड्यातून ते सेनेकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Web Title: Sonawane family's third generation Japaate legacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.