एकनाथराव खडसे यांच्या कार्याची धडाडी सून रक्षा आणि कन्या रोहिणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 03:27 PM2018-12-17T15:27:51+5:302018-12-17T15:35:51+5:30

आमदार एकनाथराव खडसे यांनी ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहिलेत. त्यांनी आपला राजकीय वारस जाहीर केला नसला तरी सून खासदार रक्षा खडसे व मुलगी रोहिणी खडसे खेवलकर हे त्यांचा वसा यशस्वीपणे चालवित आहे.

 Sone Defense and Virgo Rohini of the work of Eknathrao Khadse | एकनाथराव खडसे यांच्या कार्याची धडाडी सून रक्षा आणि कन्या रोहिणीत

एकनाथराव खडसे यांच्या कार्याची धडाडी सून रक्षा आणि कन्या रोहिणीत

Next
ठळक मुद्देदोघीनींही स्वत:च्या कर्तृत्वाने आपले अस्तित्व निर्माण आणि सिद्धही केले आहे दोघांची राजकीय वाटचाल खडसेंचा वारसा चालविणारी ठरली आहे.

मुक्ताईनगर (मतीन शेख)
मुरब्बी राजकारणी, अभ्यासू व उत्कृष्ट संसदपटू व फर्डे वक्ते अशा अनेक बिरुदांनी राज्यभरात लौकिक असलेल्या आमदार एकनाथराव खडसे यांनी ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहिलेत. त्यांनी आपला राजकीय वारस जाहीर केला नसला तरी सून खासदार रक्षा खडसे व मुलगी रोहिणी खडसे खेवलकर हे त्यांचा वसा यशस्वीपणे चालवित आहे.
खडसे यांचे राजकीय वारस म्हणून सून खा. रक्षा खडसे आणि मुलगी रोहिणी खडसे यांच्याकडे पाहिले जात आहे. खडसेंच्या राजकीय वलयापलीकडे दोघीनींही स्वत:च्या कर्तृत्वाने आपले अस्तित्व निर्माण आणि सिद्धही केले आहे. कोथळीच्या सरपंच, जि.प. सदस्य, आरोग्य सभापती आणि थेट खासदार अशा वाटचालीत प्रत्येक टप्प्यावर खासदार रक्षा खडसे यांनी स्वत:ला यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून सिद्ध केले आहे.
खडसे यांच्या धडाडीची छाप रक्षा खडसे यांच्या कामाच्या पद्धतीत दिसून येते. मग नेत्यांकडे काम घेऊन आलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या दाखल्याचे काम असो, की आखाती देशात अडकलेल्या नागरिकाला सोडविण्याचा प्रश्न असो. खासदार रक्षा खडसे यांचा पाठपुरावा जागेवरूनच सुरु होतो. त्यांचा लोकसभेतील कामकाजात सक्रीय सहभाग, अभ्यास यामुळे त्यांनी संसदेत मांडलेल्या प्रश्नांतून कामाची छाप उमटविली आहे. देशातील महिला आणि युवा खासदारांच्या अव्वल रांगेत त्यांचे नाव आहे. अगदी पंतप्रधान यांनी टिष्ट्वटरवर त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. राजकारणात त्या जेवढ्या सक्रीय आहेत. तेवढ्याच कुटूंबाबाबत सजग आहेत. व्यस्त दिनचर्येतून मुलांना व कुटूंबाला ते आवर्जून वेळ देतात.
खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे -खेवलकर यांची राजकारणातील एन्ट्री सहकार आणि औद्योगिक क्षेत्रातून झाली आहे. एकेकाळी अडगळीत पडलेल्या मुक्ताई सूतगिरणीचा कारभार हातात घेऊन त्यांनी सूतगिरणीचे चाते फिरविले. एवढेच नाही तर निर्यात दर्जाचे सूत येथे निर्माण होऊ लागले आहे. व्हाईस चेअरमन म्हणून मुक्ताई शुगर अँड एनर्जीच्या निमित्ताने येथील साखर कारखान्याला नवसंजीवनी त्यांनी मिळवून दिली आणि मुक्ताई साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल आज सुरू आहे. अगदी अडीच हजार मेट्रिक टन क्षमता असलेला हा कारखाना आज रोजी पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. तर कारखान्याचा वीजनिर्मिती प्रकल्प यशस्वीपणे सुरू आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामाची छाप उमटवली आहे. तर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे कार्य सुरु आहे.
आमदार खडसे यांचा वसा घेतलेल्या सून खासदार रक्षा खडसे यांची यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रियता तर सहकार व औद्योगिक क्षेत्रात मुलगी रोहिणी खडसे खेवलकर यांनी स्वत:ला उत्तम प्रशासक सिद्ध केल्याने दोघांची राजकीय वाटचाल खडसेंचा वारसा चालविणारी ठरली आहे.

Web Title:  Sone Defense and Virgo Rohini of the work of Eknathrao Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.