अमळनेर तालुक्यातील फाफोरे येथे सोनवणे दाम्पत्यातर्फे शीत शवपेटी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 05:29 PM2020-01-31T17:29:39+5:302020-01-31T17:30:17+5:30
गटविकास अधिकारी संजय सोनवणे आणि त्यांच्या पत्नी भारती सोनवणे यांनी स्वातंत्र्यसैनिक तानीराम तुकाराम सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फापोरे गावाला शीत शवपेटी भेट दिली.
अमळनेर, जि.जळगाव : येथील मूळ रहिवासी असलेले गटविकास अधिकारी संजय सोनवणे आणि त्यांच्या पत्नी भारती सोनवणे यांनी स्वातंत्र्यसैनिक तानीराम तुकाराम सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फापोरे गावाला शीत शवपेटी भेट दिली.
ग्रामीण भागात कोणाचेही निधन झाल्यास मृतदेहाची अवहेलना होऊ नये यासाठी लवकरात लवकर अंत्ययात्रा काढावी लागते. त्यामुळे मृतकाच्या जवळच्या नातेवाईकांनाही अनेकदा अखेरचे दर्शन मिळत नाही. ही गंभीर व भावनिक बाब लक्षात घेऊन संजय सोनवणे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक तानीराम सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शीत शवपेटी भेट दिली. याबद्दल ग्रामस्थांनी सोनवणे दाम्पत्याचा सत्कार केला.
यावेळी फ्रूटसेल सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब पाटील, माजी नगरसेवक राजू कापरेकर, चेअरमन जी.एस.पाटील, माजी सरपंच जितेंद्र पाटील व मयूर पाटील, बबनराव पाटील, दिनेश पाटील, किशोर पाटील, जिजाबाई पाटील, सोनिया पाटील, शिवनाथ सोनवणे, भालेराव पाटील, संजय पाटील, हनुमंत पाटील, ग्रामसेवक देवीदास माळी, सुरेश पाटील, प्रा.बिर्ला आदी उपस्थित होते.