अंगणवाडी सेविकेची सोनपोत लांबविली

By admin | Published: March 24, 2017 12:34 AM2017-03-24T00:34:25+5:302017-03-24T00:34:25+5:30

बसमध्ये चढताना प्रकार : चौकशीसाठी बस पोलीस ठाण्यात

The Sonpot of Anganwadi Sevaks will be removed | अंगणवाडी सेविकेची सोनपोत लांबविली

अंगणवाडी सेविकेची सोनपोत लांबविली

Next

जळगाव : नवीन बसस्थानकात जळगाव-कुरंगी बसमध्ये चढताना फेसर्डी ता. पाचोरा येथील अंगणवाडी सेविका महिलेची सोनसाखळी लांबविल्याची घटना गुरुवारी दुपारी १़१५ वाजेच्या सुमारास घडली़ यादरम्यान प्रकार वेळीच लक्षात आल्याने आठ ग्रॅम पैकी चार ग्रॅमचे मणी महिलेच्या हाती लागले़ चालक व वाहनाने थेट जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बस नेली़ प्रवाशांच्या चौकशीनंतर बस परत मार्गस्थ झाली़
अलका पाटील  खाजगी कामासाठी २४ रोजी जळगावला आल्या होत्या़ २५ पासून वावदडा येथे प्रशिक्षण असल्याने त्या घरी न जाता थेट वावदडा येथे जाणार होत्या़ त्या  जळगाव-कुरंगी बसमध्ये चढताना  गर्दीचा फायदा घेत चोरट्याने अलका पाटील यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढली़ प्रकार लक्षात आल्याने सोनसाखळीतील काही मणी हाती लागले़ आठ ग्रॅमच्या सोनसाखळीपैकी साडेतीन ग्रॅमचे मणी व मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याचे अलका पाटील यांनी सांगितले़
जळगाव-कुरंगी (क्ऱ एम एच ४०, एन ९१०५) बसमध्ये मानसिंग बिसन परदेशी हे चालक तर रघुनाथ नामदेव तायडे हे वाहक होते़ घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे एएसआय शिवाजी वराडे, हेड कॉन्स्टेबल प्रशांत पाठक, सिद्देश डाबकर यांनी बसस्थानक गाठले़ प्रवाशांपैकी कुणी संशयित असावा, या चौकशीसाठी बस थेट जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आली़ तेथे पाटील यांचा जबाब नोंदविला़

अल्पवयीन मुलीला पळविणाºयाविरूध्द बलात्काराचा गुन्हा
एका तरूणाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी शहर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुरूवारी या घटनेत पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्यानेवैद्यकीय तपासणीनंतर तरूणाविरोधात बलात्कार तसेच बाल लैंगिंग अत्याचाराचे वाढीव कलम लावण्यात आले असून संबंधित तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे़ रामेश्वर कॉलनी परिसरातील एका तरुणाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवित १६ रोजी पळवून नेले होते़ आठवडाभरानंतर बुधवारी रात्री दोघे सुरत येथून रेल्वेने जळगावला परतले़ मुलगी घरी गेल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी तत्काळ शहर पोलीस स्टेशन गाठले़ पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले़ त्यानुसार तरूणाविरोधात वाढीव कलम लावले आहे़ मुलीला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे़

Web Title: The Sonpot of Anganwadi Sevaks will be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.