चोपड्याला जोडणाऱ्या भोकर पुलाचे काम लवकरच -लता सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 10:42 PM2019-11-03T22:42:36+5:302019-11-03T22:42:59+5:30

औद्यागिक वसाहतीचे काम मार्गी

Soon enough for the drum connecting the chop to sleep | चोपड्याला जोडणाऱ्या भोकर पुलाचे काम लवकरच -लता सोनवणे

चोपड्याला जोडणाऱ्या भोकर पुलाचे काम लवकरच -लता सोनवणे

Next

जळगाव : चोपडा येथे एमआयडीसी उभारण्याचा प्रयत्न आहे. यासाठी एमआयडीसीची व शासनाची प्रत्येकी २० हेक्टर जमीन घेण्यात येणार आहे. आचारसंहितेमुळे हे काम थोडे लांबले आहे. मात्र हे काम आता तत्परतेने मार्गी लावले जाईल, तसेच चोपडा आणि जळगावला जोडणाºया भोकर पुलाचे कामही पूर्णत्वास जाईल, अशी माहिती चोपडा येथील शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदार लता सोनवणे यांनी दिली. आमदार सोनवणे यांनी शनिवारी सकाळी शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील ‘लोकमत’ शहर कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांचे पती चंद्रकांत सोनवणे हेही उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चे सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
अनेक वर्षानंतर एका महिलेला आमदारकी मिळाली आहे, कसं वाटतंय?
जळगाव जिल्ह्याला अनेक महिलांचा वारसा मिळाला आहे. प्रतिभाताई पाटील यांनी तर देशाचे सर्वाेच्च पद भूषवले आहे. त्यामुळे राजकारणात ही एक परंपरा तयार झाली आहे. तेच संस्कार आणि संस्कृती आमचीही वाटचाल सुरु राहिल.
विधानसभेत यश मिळवले त्यामागचे रहस्य काय?
लोकांचा संपर्क आणि शिवसेनेने मनापासून काम केले. आमच्यावर संकट आले तरी एकाही शिवसैनिकाने साथ सोडली नाही. सर्वांनीच प्रामाणिकपणे काम केले. इतर पक्षाच्या लोकांनीही मदत केली आहे.
या निवडणुकीत बंडखोरांची जास्त डोकेदुखी झाली, तुम्हाला या निवडणुकीत बंडखोरांचा कितपत फटका बसला?
नाही. आम्हाला बंडखोरांचा फटका बसला नाही. मागील निवडणुकीत आम्हाला ३० हजार तर यावेळी ३२ हजार मते मिळाली आहेत. उलट या निवडणुकीत आमची दोन हजार मते वाढली आहेत.
भाजपने चिंतन बैठक घ्यावी आणि त्यात काय ते ठरवावे.
या निवडणुकीत बंडखोरी कितपत टिकली?
नाही, टिकलीच नाही. उलट बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारले. मात्र यामध्ये हरिभाऊंसारखे चांगले व्यक्तिमत्व पडले, याचे दु:ख वाटते.
परकीय स्वकियांचा काही त्रास झाला या निवडणुकीमध्ये?
नाही. स्वकियांचा त्रास झालाच नाही. मी मघाशीच म्हणाले, शिवसेना कार्यकर्त्यांनी मेहनत केली, एक जणही गद्दार झाला नाही. चोपड्यात अनेकांच्या त्यागातून शिवसेना उभी राहिली आहे. या निवडणुकीत आम्ही दीर शाम सोनवणे अथवा नाना सोनवणे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो. पण कार्यकर्त्यांनी माझ्या नावाचा आग्रह धरला. त्यामुळे मीच ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
आमदारकी मिळाल्यानंतर भविष्यात आपल्या काय योजना आहेत?
शासनाच्या अनेक योजना आहेत. खूप चांगल्या आहेत, पण त्या लोकांपर्यंत पोहोचतच नाही. चोपड्यातील एमआयडीसीचा विषय आहे. आचारसंहिता आता संपली आहे, त्यामुळे या कामाला आता सुरुवात होईल. चोपडा-जळगाव या दोन तालुक्याना जोडणाºया भोकर पुलासाठीही प्रयत्न चालू आहेत. या पुलासाठी ११३ कोटी मंजूर झाले आहेत. या पुलामुळे जळगाव-चोपडा हे अंतर खूप कमी होणार आहे. या पुलाची दहा वर्षे देखभाल दुरुस्ती ठेकेदाराने करायची आहे. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे २० वर्षांपूर्वी अनेर नदीवर हंड्या कुंड्या प्रकल्प मंजूर झाला आहे. पण त्याला गती मिळाली नाही. त्याला आम्ही गती देणार आहोत. या प्रकल्पाचा फायदा २० ते २५ गावांना होणार आहे. या नदीचे पाणी खूप प्रमाणात वाहून जाते आहे, ते अडवता येईल. २० वर्षांपासून हा विषय केवळ अंदाजपत्रकात येतो. पण त्यापुढे काहीच होत नाही. धानोरा सबस्टेशनचे कामही मार्गी लावणार आहोत.
मोजलेली मते आणि प्रत्यक्षात झालेले मतदान यामध्ये यावेळी तफावत दिसली!
चोपडामध्ये असे काही झालं नाही. याबाबत अधिकाऱ्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं की, काही मतांचा फरक पडला. पण मतमोजणी करताना मॅन्युअली एरर आहे, असं मला वाटतं. पण हा मतांचा फार फरक नसल्यामुळे या निवडणुकीत याची काही चर्चा झाली नाही.

शिवसेनेने बंडखोरांवर कारवाई केली; पण भाजपने केली नाही!
आम्ही भाजपचे काम निष्ठेने केले, या निवडणुकीतही केले. जे बंडखोर उभे राहिले, त्यांच्यावर आम्ही कारवाई केली अगदी निवडणूक होण्यापूर्वीच! पण भाजपने तसे केले नाही. उलट त्यांच्या बंडखोरांनी तर पोस्टरवर त्यांच्या पक्षाच्या सिम्बॉलचाही वापर केला. पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही. याचा अर्थ भाजपनेच त्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता. महाराष्ट्रात ९२ ठिकाणी भाजपने शिवसेनेविरोधात बंडखोर उभे केले. शिवसेनेने असे कधीच केले नाही तर युतीचा धर्म नेहमीच पाळला.
चोपडा तालुक्याच्या काही भागाचा दौरा केला असता अनेक ठिकाणी मक्याची कणसे गळून पडली होती आणि त्याला कोंब आले होते. शेतकºयांना शेतीतून काहीच मिळालं नाही, हे हृदय पिळवटून टाकणारं दृश्य होतं, हे सांगत असतानाही आमदार लता सोनवणे यांच्या डोळ्यात पाणी आले.

Web Title: Soon enough for the drum connecting the chop to sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव