लवकरच समान बांधकाम नियमावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:20 PM2020-01-13T22:20:32+5:302020-01-13T22:20:45+5:30

जळगाव : राज्यातील सर्वच शहरात बांधकामाविषयी समान नियमावलीची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल, अशी ग्वाही महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांनी बांधकाम ...

 Soon the same construction rules | लवकरच समान बांधकाम नियमावली

लवकरच समान बांधकाम नियमावली

googlenewsNext

जळगाव : राज्यातील सर्वच शहरात बांधकामाविषयी समान नियमावलीची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल, अशी ग्वाही महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांनी बांधकाम व्यावसायिकांना दिली. या सोबतच बांधकामासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणविषयक नाहरकत परवानगी राज्यस्तरावरच देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
क्रेडाई महाराष्ट्र या बांधकाम व्यावसायिकांच्या राज्यस्तरीय शिखर संघटनेतर्फे बांधकाम व्यावसायिकांसाठी मुंबई येथे ६ व ७ जानेवारी रोजी ‘महाकॉन २०२०’ या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी निमंत्रित आमदार आदित्य ठाकरे, रोहित पवार, ऋतूराज पाटील यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर उत्तर देताना वरील ग्वाही दिली.
‘रायझिंग अबोव्ह’ असे ब्रीदवाक्य घेऊन झालेल्या अधिवेशनासाठी तीनही आमदारांसह क्रेडाई नॅशनलचे प्रेसिडेंट सतीश मगर, ‘महारेरा’चे चेअरमन गौतम चॅटर्जी, शेअर बाजार गुंतवणुकविषयक मार्गदर्शक राकेश झुनझुनवाला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जळगावमधून या अधिवेशनासाठी क्रेडाईच्या राज्य शाखेचे सहसचिव अनिश शहा, जळगाव शाखा अध्यक्ष निर्णय चौधरी, पुष्कर नेहेते, आबा चव्हाण, चंदन कोल्हे, सागर ताडे तसेच राज्यातील तालुका व जिल्हास्तरीय ५७ शाखांमधून ७०० ते ७५० बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.
एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिक प्रथमच एकत्र आले, असे क्रेडाईच्यावतीने सांगण्यात आले.
बांधकाम व्यवसायामुळे इतर व्यवसायांनाही चालना
नवीन सरकारमधील तरुण आमदारांचे महाराष्ट्राबद्दल काय ‘व्हीजन’ आहे, या दृष्टीने खास आमदार आदित्य ठाकरे, रोहित पवार, ऋतूराज पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्या वेळी आपल्या व्हीजनविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, २५० घटक एकत्र येऊन बांधकाम आकाराला येते. पर्यायाने या व्यवसायावर तेवढेच घटक अवलंबून असतात व बांधकामामुळे त्यांना चालनाही मिळते.
त्यामुळे बांधकाम व्यवसायाच्या अडचणी सोडवून त्याच्यासह सर्वच क्षेत्राला चालना मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही सांगण्यात आले.
राज्यात सध्या बांधकामाविषयी प्रत्येक शहरात वेगवेगळी नियमावली आहे. ती टाळून आता समान नियमावली राबविण्यासाठी सरकारतर्फे धोरण निश्चित करण्यात येईल, असे तीनही आमदारांनी सांगितले.
 

Web Title:  Soon the same construction rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.