ज्वारीची श्रीमंती वाढली ; गव्हापेक्षाही जास्त भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:39+5:302021-07-14T04:18:39+5:30

(डमी ९०६) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही वर्षांपासून बदललेल्या जीवनमानामुळे नागरिक आरोग्याकडे गांभिर्याने लक्ष देवू लागले आहेत. ...

Sorghum wealth increased; Prices higher than wheat | ज्वारीची श्रीमंती वाढली ; गव्हापेक्षाही जास्त भाव

ज्वारीची श्रीमंती वाढली ; गव्हापेक्षाही जास्त भाव

Next

(डमी ९०६)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून बदललेल्या जीवनमानामुळे नागरिक आरोग्याकडे गांभिर्याने लक्ष देवू लागले आहेत. यासाठी अनेकांकडून आपल्या खान-पानावर लक्ष दिले जात आहे. वजन वाढवणारे पदार्थ, फॅट जास्त असणारे व आरोग्याला अपायकारक ठरतील असे पदार्थ खाणे टाळत आहेत. त्यात ज्वारीमुळे आरोग्याला होणारा फायदा पाहता आता नागरिकांकडून चपाती ऐवजी भाकरीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे ज्वारी, दादरची मागणी वाढली असून, बाजारात गव्हापेक्षाही ज्वारीचे भाव वाढले आहेत.

ज्वारी हे भारताचे अस्सल पीक आहे. तर गव्हाचे बीज हे मुळ अमेरिकेहून आले होते. आजच्या ४० ते ४० वर्षांपुर्वी ग्रामीण भागातील नागरिकांच्या जेवनात भाकरीचाच समावेश होत होता. मात्र, २० ते ३० वर्षांपासून गव्हाच्या चपात्यांचा समावेश आहारात होवू लागल्याने ज्वारीचे भाव देखील कमी होत होते. मात्र आता नागरिकांना आरोग्य हीच संपत्ती हे लक्षात आले असून, आपल्या आहाराबाबत नागरिक आता फारच गांभिर्याने विचार करू लागले आहेत. याच बदलामुळे आता अनेकांचा आहारातून चपाती गायब होवून भाकरीचा समावेश वाढला आहे.

अशी वाढली ज्वारीची श्रीमंती

२००५ -गहू १२०० - ज्वारी ७००

२००७- गहू १४०० ज्वारी ९००

२००९ -गहू १६०० ज्वारी १४००

२०१५ -गहू १८०० ज्वारी १५००

२०२० -गहू ३००० ज्वारी ४०००

२०२१ - गहू २२०० ज्वारी ३०००

आपल्या आरोग्याची श्रीमंती ज्वारीतच

१. आजच्या काळात नागरिक आरोग्याला मोठे महत्व देत आहेत. आजही ग्रामीण भागात आजही ज्वारीचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळेच कदाचित शहरातील लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यविषयक तक्रारी कमी असतात. त्यात आता शहरातील नागरिक देखील ज्वारीच्या भाकरीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत.

२. ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. ती उर्जा दिवसभर कामी येते म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी ज्वारीला प्राधान्य देतात. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अॅमिनो अॅसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटिन्स मिळतात. आहारात ज्वारीची भाकरी नसल्यामुळे ज्वारीतून मिळणाऱ्या पोषक तत्वाचा शरीरात अभाव जाणवतो.

३. ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे त्याने पोट साफ होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना अॅसिडिटीचा त्रास आहे त्यांनी चपातीच्या ऐवजी आहारात ज्वारीची भाकरी समाविष्ट करावी. ज्वारीच्या सेवनाने मुळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.

जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन वाढले

गेल्या काही वर्षात बाजारात ज्वारीची मागणी वाढल्याने जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या एकूण लागवड क्षेत्रात वाढ होताना दिसून येत आहे. ज्वारीला बाजारात गव्हापेक्षा चांगला भाव भेटतो. तसेच ज्वारीचा चाऱ्यासाठी देखील वापर होत असतो. त्यामुळे जिल्ह्यात ज्वारीच्या लागवड क्षेत्रात चांगलीच वाढ होत आहे. खरीप व रब्बी हंगामात देखील ज्वारी घेतली जात आहे.

आरोग्याची श्रीमंती ज्वारीतच

ज्वारीची भाकरी पचायला हलकी असते. यामुळे नागरिक सध्या ज्वारीच्या खाद्यपदार्थाला पसंती देत आहेत. गव्हापेक्षा ज्वारी आरोग्याच्या दृष्टीने चांगली असते. यामुळे आहारतज्ज्ञ तसेच आयुर्वेदिक डाॅक्टर अनेकांना ज्वारीचे सेवन करण्याचा सल्ला देतात. यामध्ये ज्येष्ठ नागरिक दररोजच्या आहारामध्ये ज्वारीच्या भाकरीला प्राधान्य देतात.

भाकरी परवडायची म्हणून खायचो

आधीच्या काळात गव्हाचे भाव खूप जास्त असायचे, त्यात ज्वारीची लागवड जास्त होत असल्याने गव्हापेक्षा ज्वारी परवडत असल्याने चपातीपेक्षा भाकरीलाच प्राधान्य दिले जात होते.

-दत्तात्रय शंकर पाटील, आव्हाणे

पुर्वी गव्हाची पोळी ही केवळ घरात पाहुणे-मंडळी आली तेव्हाच केली जात होती. गहू आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने ज्वारीच्या भाकरीचाच समावेश नागरिकांच्या आहारात होत होता. आता देखील तो वाढू लागला आहे.

-तुळशीराम पाटील, तावसे

आता चपातीच परवडते

आता नागरिक पैशांपेक्षा आरोग्याला महत्व देत आहेत. नागरिकांना चपाती परवडत असली तरी काळ बदलत जात आहे. ज्वारी महाग मिळत असतानाही नागरिक आरोग्यासाठी ज्वारीची भाकर खात आहेत.

-विजय पाटील, गाढोदे

गहू आणि ज्वारीच्या दरापेक्षा सध्या घरी गव्हाच्या पोळ्या जास्त प्रमाणात केल्या जातात. कधीतरी ज्वारीची भाकरी केली जाते. पूर्वी ज्वारीची भाकरी खात होतो. मात्र, सध्या पोळी खाण्यास पसंती आहे.

-राजेंद्र पाटील, जळगाव

Web Title: Sorghum wealth increased; Prices higher than wheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.