सौखेडासीम प्रा. आ. केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 03:51 PM2020-04-13T15:51:12+5:302020-04-13T15:51:20+5:30

आरोग्य सभापतींकडून पाहणी : निलंबनाची केली मागणी

Soukhedasim Pvt. Come Medical officers stab at the center | सौखेडासीम प्रा. आ. केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची दांडी

सौखेडासीम प्रा. आ. केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची दांडी

Next

यावल : कारोना संसर्गाच्या पआर्श्वभूमीवर संपुर्ण आरोग्य सेवेस दक्ष राहण्याचे आदेश दिले असतांना तालुक्यातील सौखेडासीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोन्ही वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात गैरहजर असल्याचे जि. प. आरोग्य व शिक्षण समिती सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी रविवारी आरोग्य केंद्रास भेट दिली असता आरोग्य कें्रदात निदर्शनास आले. यवेळी केवळ चौकीदार हजर होता.
साथीच्या रोगाच्या काळात शासनाचे आदेश असतांना एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याबाबात व कडक कार्यवाहीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे सभापती पाटील यांनी तक्रार दिली असून जिल्हा आरोग्य अधिकारी आता कोणती कारवाई करतात याकडे तालुकावासियांचे लक्ष लागलेले आहे.
सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यातील सौखेडासीम येथील प्राथमीक आरोग्य केंद्रावर कोरोना संसर्गाच्या पार्श्श्वभुमीवर जि. प. आरोग्य व शिक्षण सभापती रविंद्र पाटील यांनी रविवारी भेट दिली असता केंद्रात वॉचमन शिवाय कोणीही आढळून आले नाही. कोरोना संसर्गाच्या पाघर्वभुमीवर शासनाने आरोग्य विभागाच्या सुटया रद्द केल्या असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये असे शासनाचे आदेश असतानां येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.गौरव भोईटे व डॉ. नजमा तडवी हे दोन्ही वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात उपस्थीत नव्हते.
निवासाचे काम पाडले बंद
याच परीसरात वैद्यकीय कर्मचाºयांसाठी निवासस्थाने बांधण्याचे काम सुरू असतांना आणि तेथे कोणीही जवाबदार कर्मचारी उपस्थीत नसल्याने ठेकेदार निकृष्ट साहित्य वापरून निवासाचे बांधकाम करीत असल्याचेही पाटील यांना आढळून आले. पाटील यांनी सुरू असलेले काम तात्काळ बंद पाडले असून आपण याबाबत देखील चौकशी करून ठेकेदारावर कार्यवाही करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे .

Web Title: Soukhedasim Pvt. Come Medical officers stab at the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.