चिमुकल्याच्या फिरकीने पोलिसांसह शिक्षकांची धावपळ
By admin | Published: March 24, 2017 11:46 PM2017-03-24T23:46:30+5:302017-03-24T23:46:30+5:30
वर्गशिक्षिकेमुळे चिमुकल्याच्या बनाव नाटय़ावर पडदा पडला़ मात्र या चिमुकल्याने नाटय़ामुळे पोलीस कर्मचा:यासह आऱआऱविद्यालयाच्या शिक्षकांची एकच धावपळ उडाली़
जळगाव : माङया आई-वडीलांचा मृत्यू झाला आह़े मला घर नाही, नातेवाईकांनी वा:यावर सोडले आह़े अशी कहाणी सांगत एकाला भररस्त्यात थांबविल़े नागरिकांने विश्वास ठेवून त्याला मदत मिळावी म्हणून जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केल़े पोलिसांनी तपासचक्रे फिरविली़ त्याच्या शिक्षकांनाही बोलविल़े वर्गशिक्षिकेमुळे चिमुकल्याच्या बनाव नाटय़ावर पडदा पडला़ मात्र या चिमुकल्याने नाटय़ामुळे पोलीस कर्मचा:यासह आऱआऱविद्यालयाच्या शिक्षकांची एकच धावपळ उडाली़
यश आशुतोष साळुंखे (वय 12) रा़ रामेश्वर कॉलनी असे त्याचे नाव आह़े यश शुक्रवारी दुपारी काही कपडे, पाण्याच्या दोन बाटल्या तसेच बिस्टीकचा पुडा असलेली शाळेची बॅगमध्ये ठेवून घरून पळाला़ मेहरूण परिसरातून जळगाव-पाचोरा रस्त्यावर पोहचला़ यादरम्यान त्याचे चौकातून दुचाकीवरून जात असलेल्या अमृत बळीराम मिस्तरी यांना थांबविल़े त्यांना ओंकारेश्वर मंदिरावर जायचे असे सांगितल़े
मिस्तरी यांना शंका आल्याने त्यांनी यशला सोबत घेत जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केल़े याठिकाणी यशने आई-वडील, घरदार नसल्याचा नाटक केल़े काम करून शिकत असून रोज केवळ बिस्कीटचा पुडा खावून दिवस काढत असल्याची बतावणीही त्याने केली़ चिमुकल्याच्या करून कहाणीवर विश्वास ठेवत पोलिसांनी त्याला एका हॉटेलात जेवू घातल़े पोलीस कॉन्स्टेबल काजीम देशमुख, छगन तायडे, गणेश निकम व राजेश मेंढे यांनी यश नेमका कोण त्याचा शोधार्थ तपासचक्रे फिरविल़े
पोलिसांनी यशच्या आई-वडीलांशी संपर्क साधला़ काही काळातच तेही जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोहचल़े त्यांच्या माहितीवरून चिमुकल्याच्या नाटकावर पदडा पडला़ यशचे वडील आशुतोष साळुंखे हे चटई कंपनीतील कामगार आहेत़नाटक का केले? हे मात्र कळू शकले नाही़