जि.प.तील निविदा प्रक्रियेत बनवाबनवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:02 PM2018-04-15T12:02:57+5:302018-04-15T12:02:57+5:30
कामांचा दर्जा खालावतोय
ठळक मुद्देशिवसेनेने वेधले आहे लक्षकमी खर्चात काम परवडतेच कसे?
ज गाव : जिल्हा परिषदेत निविदा प्रक्रियेत अनेक कामांच्या निविदा मंजूर होताना अधिका:यांच्या सहकार्याने ‘बनवाबनवी’ सुरु आहे. यामुळे कामांचा दर्जा खालावत असून शासन आणि जनता यांचे मोठे नुकसान होत आहे.शिवसेनेने वेधले आहे लक्षकमी खर्चात टेंडर घेतल्याने या कामाचा दर्जा अजिबात चांगला असू शकत नाही, ही बाब लक्षात घेता शिवसेनेने नुकत्याच स्थायी समितीच्या बैठकीत 5 टक्के पेक्षा अधिक बिलो ठेका असलेल्या कामांची स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. यामुळे मात्र या प्रकाराला आळा बसण्याची आशा आहे.वेगवेगळ्या नावाने टेंडरअनेकदा एकच व्यक्ती वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या दराचे टेंडर भरतो. यात इतर टेंडरच्या तुलनेत जे टेंडर कमी दराचे असेल ते टेंडर मंजूर होतेच. यामुळे काम हातून सुटत नाही, असाही एक फंडा नेहमीचे ठेकेदार वापरतात. कोणत्याही दरात काम करण्याची त्यांची ‘क्षमता’ असते.सुबे ठेक्यांबाबत नोंद नाहीसुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी काही प्रमाणात डेंटर राखीव असतात. मात्र या ठेक्यांचीही कोणतीही नोंद जि. प. कडे नसते यामुळे एकाच सुशिक्षित बेरोजगाराच्या नावावर अनेकदा वेगवेगळे ठेके दिले जात असल्याचा प्रकारही घडत आहे. एका अभियंत्याच्या मुलाच्या नावाने अनेक ठेके मंजूर झाल्याची तक्रारही नुकतीच पुढे आली आहे. कमी खर्चात काम परवडतेच कसे?एखादी निविदा निघल्यास काही ठेकेदार हे 15 ते 20 टक्के पेक्षा कमी दराने काम घेतात. मात्र कोणत्याही कामाची निविदा काढताना जे इस्टीमेट तयार केले जाते ते तज्ञ व्यक्तीकडून तयार केले जाते. त्यामुळे साधारणत: तेवढा खर्च हा त्या कामास येणारच असतो. परंतु एखादे काम दहा लाखाचे असल्यास 20 टक्के कमीने म्हणजे 8 लाखात ते परवडणारेच नसते. अशा वेळी कामाचा दर्जा हा खूपच खालावेल हे निश्चित असते. परंतु संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची मिलीभगत असल्याने ठेकेदाराला कामाच्या दर्जाची चिंता नसते.