कॉमर्स शिक्षण घेत असलेल्यांसाठी विशेष ३६ तासांचा कोर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:21 AM2021-06-16T04:21:41+5:302021-06-16T04:21:41+5:30
जळगाव : जे विद्यार्थी कॉमर्सचे शिक्षण घेत आहेत, मात्र जे सीए अभ्यासक्रम करीत नाहीत, त्यांच्यासाठी विशेष ३६ तासांचा कोर्स ...
जळगाव : जे विद्यार्थी कॉमर्सचे शिक्षण घेत आहेत, मात्र जे सीए अभ्यासक्रम करीत नाहीत, त्यांच्यासाठी विशेष ३६ तासांचा कोर्स (टीईएल) १ जुलैपासून सुरू करीत आहे. हा कोर्स झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना टॅक्स, ऑडिट इतर आवश्यक अकाऊंटबाबत प्रॅक्टिकली माहिती मिळेल. त्यांना सहज रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी माहिती आयसीएआयच्या पश्चिम विभागाचे चेअरमन सीए मनिष गादीया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
चेअरमन मनिष गादीया यांनी मंगळवारी जळगाव ब्रँचला भेट दिली. व्हाईस चेअरमन सीए दृष्टी देसाई, सेक्रेटरी अर्पित काबरा, ट्रेझरर जयेश काला, आरसीएम उमेश शर्मा, जळगाव ब्रँचचे चेअरमन प्रशांत अग्रवाल, व्हाईस चेअरमन सौरभ लोढा, सेक्रेटरी विक्की बिर्ला, माजी चेअरमन स्मिता बाफना, सागर पटनी, पंकज अग्रवाल आदी उपस्थित होते. ज्या महिला सीए झालेल्या आहेत, मात्र वेळेअभावी त्या सीएचे काम पूर्णवेळ, अर्धवेळ करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी घरबसल्या रोजगार मिळेल, अशी संधीही आम्ही उपलब्ध करून देत असल्याची माहिती त्यांनी दिली.
यंदा लॉकडाऊनमुळे सीए विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. ५ जुलैला ती परीक्षा होण्याचा अंदाज आहे. यंदा टेक्नॉलाॅजीवर आम्ही भर दिला आहे. तसेच जे विद्यार्थी कॉमर्स माध्यम घेतात, बी.कॉम. करतात, मात्र त्यांना अकाैंट लिखाण, टॅक्सेशन आदी बाबींचा अनुभव नसतो. तो अनुभव नसल्याने पात्रता असूनही कमी वेतनात त्यांना काम करावे लागते. अशा विद्यार्थ्यांसाठी ३६ तासांचा विशेष कोर्स आम्ही देत आहे. या कोर्समुळे तो विद्यार्थ्यांना अनुभव मिळेल. त्या विद्यार्थ्यांना सी.ए.कडे जॉब प्लेसमेंटही देणार आहे.