मतदान वाढविण्यासाठी तीन घटकांवर विशेष लक्ष - निवडणूक निरीक्षक डॉ़ पार्थसारथी मिश्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:29 PM2019-10-16T12:29:39+5:302019-10-16T12:29:45+5:30

जनजागृतीवर भर

Special attention to three factors to increase voting | मतदान वाढविण्यासाठी तीन घटकांवर विशेष लक्ष - निवडणूक निरीक्षक डॉ़ पार्थसारथी मिश्रा

मतदान वाढविण्यासाठी तीन घटकांवर विशेष लक्ष - निवडणूक निरीक्षक डॉ़ पार्थसारथी मिश्रा

Next

जळगाव : लोकशाहीत निवडणूक हा एक उत्सव असतो व हा उत्सव लोकसहभागानेच अधिक फुलतो, त्यासाठी अधिकाधिक मतदान होणे आवश्यक आहे़ मतदानाचा टक्का वाढावा म्हणून नवमतदार, अशिक्षित मतदार व नोकर वर्ग या तिघांवर लक्ष केंद्रीत करुन जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती जळगावात आलेले निवडणूक निरीक्षक डॉ़ पार्थसारथी मिश्रा यांनी दिली़
मतदानाबाबत करण्यात येत असलेल्या जनजागृतीबाबत डॉ़ मिश्रा यांनी मंगळवारी सायंकाळी ‘लोकमत’शी संवाद साधला़ त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे अशी :
प्रश्न: जागृती खूप होते मात्र मतदानाचा टक्का वाढत नाही, यासाठी काय विशेष उपाययोजना?
डॉ़ मिश्रा: निवडणुका यशस्वी तर लोकशाही यशस्वी, जेव्हा मुक्तपणे, कुठल्याही दबावाला बळी न पडता अधिक मतदान होते तेव्हा निवडणुका यशस्वी होतात़
एका उत्सवाप्रमाणे यात सहभाग वाढणे महत्त्वाचे आहे़ यासाठी नवमतदारांना प्रोत्साहीत करणे, त्यांना महत्त्व समजावणे, यासह ज्या मतदारांना आपल्या अधिकाराबाबत माहितीही नसते त्यांना प्रोत्साहित करणे व नोकरवर्ग जो आहे तो यापासून वंचित राहू नये याबाबत सतर्क राहणे, याबाबींवर अधिक भर दिला जात आहे. आपण स्वत: शहरातील सहा ते सात महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठात, गुरूद्वारा येथे जावून तरूणांना मतदानाचे महत्त्व सांगितले़ एका सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करणे आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले़
प्रश्न : काळजी म्हणून काय उपाययोजना असतात
डॉ़ मिश्रा: आचारसंहितेसंदर्भात नियमावली ठरवून दिलेली असते़ निवडणुकीतील उमेदवार व पक्षांनी ती पाळणे बंधनकारक असते़ त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पूर्ण यंत्रणा असतेच, याव्यतिरिक्त उमेदवारांना प्रत्येक बाबींचा खर्च ठरवून दिलेला असतो तो तेवढाच करायचा असतो़ तसेच एखादवेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास केंद्रीय पोलीस दल, राज्य पोलीस दल हे नेहमी सतर्क असते, विविध भागातून फलॅग मार्च काढून पोलीस सतर्क असल्याचा संदेश दिला जातो़
या निवडणुकीत नवीन काय ?
अनेक बाबींचे फॉरमॅट बदलले आहेत़ डिजिटलायझेशन वाढले आहे़ अ‍ॅप्स उपलब्ध करून देण्यात आले आहे़ आयटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत़ या व्यतिरिक्त निवडणुकीशी संबधित अधिकाऱ्यांना आता दररोज रिपोर्ट द्यावा लागतो, दर दोन तासांनी रिर्पोटींग करावे लागते़ निवडणुका पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व उपायोजना केल्या जात आहेत़

Web Title: Special attention to three factors to increase voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव