आदिवासी जिल्ह्यांच्या विकासासाठी विशेष निधी!
By admin | Published: January 20, 2016 12:48 AM2016-01-20T00:48:13+5:302016-01-20T00:48:13+5:30
सुतोवाच : मनसुखभाई वसावा यांची आढावा बैठक
नंदुरबार : राज्यातील आदिवासी जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी केंद्राच्या आगामी अर्थसंकल्पात ‘विशेष निधी’ची तरतूद करण्यासाठी प्रय} करणार असल्याची माहिती केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री मनसुखभाई वसावा यांनी येथे दिली.‘विशेष निधी’ची तरतूद व्हावी यासाठी प्रय}शील असल्याचे सांगितले. मंगळवारी ते नंदुरबार येथे आले असता अधिकारी व पदाधिका:यांची आढावा बैठक घेतली. या वेळी खासदार डॉ.हीना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त अशोक लोखंडे, नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी गजेंद्र केंद्रे, तळोद्याचे प्रकल्प अधिकारी अभिजित राऊत यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. अपर आयुक्त लोखंडे यांनी आमसूल, मिरची तसेच डाळींवर औद्योगिक प्रकल्प प्रस्तावीत असल्याचे सांगितले. आदिवासी भागातील समस्या सुटाव्यात यासाठी अर्थसंकल्पात या वेळी अधिक भर देण्यात येणार आहे. राज्यातील आदिवासी जिल्ह्यांसाठी दरम्यान, नंदुरबार येथील एकलव्य इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेच्या इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. खासदार डॉ.हीना गावीत यांनी आदिवासी भागातील दूध उत्पादकांना प्रोत्साहन व त्यांना रोजगार मिळावा यासाठी शीतकरण केंद्र तसेच इतर योजनांची अपेक्षा व्यक्त केली.