प्रवास पाससाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 08:45 PM2020-07-04T20:45:44+5:302020-07-04T20:45:54+5:30
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवासावर निर्बंध घातले आहे़ मात्र, अत्यंत तातडीच्या काम, वैद्यकीय उपचार व अडकलेल्या ...
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवासावर निर्बंध घातले आहे़ मात्र, अत्यंत तातडीच्या काम, वैद्यकीय उपचार व अडकलेल्या विद्यार्थी व नागरिकांना प्रवासासाठी पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़ त्यासाठी नागरिकांना कोविड१९ डॉट एमएचपोलीस डॉट इन या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे़
या सुविधेचा वापर करून अर्ज करणाऱ्या नागरिकांना तातडीने प्रवास पास उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे़ नागरिकांना प्रवास पास मिळविण्यासाठी आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे़ अर्ज करताना अर्जदाराचे छायाचित्र, ओळखपत्र अपलोड करणे आवश्यक असणार आहे़ त्याचबरोबर वाहन क्रमांक, वाहनाचा प्रकार, प्रवासाची तारीख, प्रवाश्यांची संख्या व नावे आदी मजकूर नमूद करावयाचा आहे़ विशेष म्हणजे, प्रवास पास ही प्रिंट करणे आवश्यक नसणार असून मोबाईल मधील प्रवास पासची सॉफ्टकॉपी ही अधिकृत धरली जाणार आहे़ दरम्यान, प्रवास पाससाठी कुठलेही शुल्क नसल्यामुळे कुठल्याही व्यक्तीने व एजंटने शुल्काची मागणी केल्यास तक्रार करण्याचेही आवाहन उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी केले आहे़