दिवाळीसाठी विशेष रेल्वे गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:16 AM2018-11-06T00:16:00+5:302018-11-06T00:16:15+5:30
रेल्वे प्रशासनाने दिवाळी सणा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मंडुडीह, संतरागाची आणि पुणे- गोरखपूर दरम्यान सहा विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत.
भुसावळ, जि.जळगाव : रेल्वे प्रशासनाने दिवाळी सणा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मंडुडीह, संतरागाची आणि पुणे- गोरखपूर दरम्यान सहा विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत.
मुंबई-मंडुडीह स्पेशल- गाडी क्र. ०१०५५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही ६ नोव्हेंबर रोजी पहाटे १२.२० वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता मंडुडीह पोहोचेल. ०१०५६ मंडुडीहवरुन ७ रोजी सकाळी ८ वाजता मंडुडीह सुटेल. दुसºया दिवशी १.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, कटनी, माणिकपूर व इलाहाबाद स्थानकांवर थांबेल.
गाडी क्र. ०२०१८ सुपरफास्ट स्पेशल ६ रोजी पहाटे ५.३० वाजता गोरखपूरवरुन सुटेल. दुसºया दिवशी दिवशी १२.१० वाजता पुणे येथे पोहोचेल. ही गाडी दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, बीना, झांसी, ओराई, कानपूर, लखनऊ, गोंडा आणि बस्ती स्थानकांवर थांबेल.
गाडी क्र.०२१०४ सुपरफास्ट स्पेशल ६ नोव्हेंबर रोजी रात्री ९.२५ वाजता संतागाचीवरुन सुटेल आणि तिसºया दिवशी सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पोहोचेल. ही गाडी दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड (केवळ ०२१०३ साठी), भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंडिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा जे., रूरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर स्थानकांवर थांबेल.
विशेष गाड्यांसाठी बुकिंग क्र. ०१०५५, ०२०१७ आणि ०२१०३ विशेष शुल्कावरील सर्व आरक्षण कार्यालयात तसेच वेबसाइटवर उपलब्ध आहे. प्रवाशांनी विशेष गाड्यांंचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.