आषाढीनिमित्त पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाड्यांची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 05:39 PM2019-06-16T17:39:22+5:302019-06-16T17:39:53+5:30
भुसावळ रेल्वे विभागातर्फे नवी अमरावती, खामगाव व भुसावळ स्टेशनवरून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येतील.
भुसावळ : आषाढी एकादशीनिमित्त वारकरी व भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूरसाठी भुसावळ रेल्वे विभागातर्फे नवी अमरावती, खामगाव व भुसावळ स्टेशनवरून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येतील. आषाढीसाठी पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांनी या गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नवी अमरावती-पंढरपूर
गाडी क्र. ०११५५ ६,७ व ९ जुलै रोजी नवी अमरावती स्थानकावरून दुपारी २ वाजेला पंढरपूरसाठी साठी सुटेल.ती दुसºया दिवशी सकाळी ११.१५ वा.पंढरपूरला पोहचेल.
गाडी क्र. ०११५६ ७ व १३ जुलै रोजी पंढरपूर स्थानकावरून दुपारी ४ वा. नवी अमरावतीसाठी सुटेल. ती दुसºया दिवशी सकाळी १०.४० वा. नवी अमरावतीला पोहचेल.
खामगाव- पंढरपूर
गाडी क्र.०११५३ ७ व १० जुलै रोजी खामगाव स्थानकावरून दुपारी ४.२० वा.पंढरपूरसाठी सुटेल.ती दुसºया दिवशी सकाळी ११.१५ वा. पंढरपूरला पोहचेल.
गाडी क्र.०११५४ ८ व १४ जुलै रोजी पंढरपूरहून दुपारी ४ वा. नवी अमरावतीसाठी सुटेल. ती दुसºया दिवशी सकाळी ८.३० वा. खामगाव येथे पोहचेल.
भुसावळ- पंढरपूर
गाडी क्र. ०११४९ ११ जुलै रोजी भुसावळ स्थानकावरून सकाळी ९.१५ वाजता पंढरपूरसाठी सुटेल. ती रात्री १०.१० वाजता पंढरपूला पोहचेल.
गाडी क्र. ०११५० १२ जुलै रोजी पंढरपूर स्थानकावरून रात्री ९.५० वाजेला भुसावळ स्टेशनसाठी सुटेल. ती दुसºया दिवशी सकाळी ८.३० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर पोहचेल.
भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.