भुसावळ-हजरत निजामुद्दीन, मुंबई-बरेली साईनगर शिर्डी-कालका दरम्यान विशेष गाड्या धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:13 AM2021-07-05T04:13:06+5:302021-07-05T04:13:06+5:30
हजरत निजामुद्दीन विशेष द्वि-साप्ताहिक गाडी क्रमांक ४०६३ विशेष द्वि-साप्ताहिक ११ जुलैपासून पुढील सूचनेपर्यंत भुसावळ येथून दर मंगळवार आणि रविवारी ...
हजरत निजामुद्दीन विशेष द्वि-साप्ताहिक
गाडी क्रमांक ४०६३ विशेष द्वि-साप्ताहिक ११ जुलैपासून पुढील सूचनेपर्यंत भुसावळ येथून दर मंगळवार आणि रविवारी ०६.०० वाजता सुटेल आणि हजरत निजामुद्दीनला दुसऱ्या दिवशी ०५.०० वाजता पोहोचेल.
०४०६४ विशेष द्वि-साप्ताहिक ९ जुलैपासून पुढील सूचनेपर्यंत हजरत निजामुद्दीन येथून दर शुक्रवार आणि रविवारी १५.०५ वाजता सुटेल आणि भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी १५.०५ वाजता पोहोचेल.
थांबे : मध्य रेल्वेवर मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, नागपूर, पांढुर्णा, मुलताई, आमला, बैतूल, घोराडोंगरी.
लोकमान्य टिळक टर्मिनस-बरेली विशेष साप्ताहिक
०४३१३ विशेष साप्ताहिक १२ जुलैपासून पुढील सुचनेपर्यंत टिळक टर्मिनस, मुंबई येथून दर सोमवारी ०८.०५ वाजता सुटेल आणि बरेलीला दुसऱ्या दिवशी १५.२९ वाजता पोहोचेल.
०४३१४ विशेष साप्ताहिक १० जुलैपासून पुढील सूचनेपर्यंत बरेली येथून दर शनिवारी ११.२५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १६.१५ वाजता पोहोचेल.
साईनगर शिर्डी- कालका विशेष द्वि-साप्ताहिक
०४५६५ विशेष द्वि-साप्ताहिक १० जुलैपासून पुढील सूचनेपर्यंत साईनगर शिर्डी येथून दर मंगळवार आणि शनिवारी १०.०० वाजता सुटेल आणि कालका येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल.
०४५६६ विशेष द्वि-साप्ताहिक ८जुलैपासून पुढील सूचनेपर्यंत कालका येथून दर गुरुवारी आणि रविवारी १७.२० वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे दुसऱ्या दिवशी १८.४० वाजता पोहोचेल.