रावेर तालुक्यातील धामोडी येथे रासेयोचे विशेष हिवाळी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 05:23 PM2018-12-24T17:23:18+5:302018-12-24T17:25:10+5:30

सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष हिवाळी शिबिर दत्तक वस्ती धामोडी, ता.रावेर येथील जि. प. मराठी शाळेत २२ ते २८ डिसेंबर दरम्यान आयोजित केले आहे.

Special Winter Campus at Rhesio at Dhamdi in Raver Taluk | रावेर तालुक्यातील धामोडी येथे रासेयोचे विशेष हिवाळी शिबिर

रावेर तालुक्यातील धामोडी येथे रासेयोचे विशेष हिवाळी शिबिर

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्याच्या हस्ते झाले शिबिराचे उद्घाटन२८ डिसेंबरपर्यंत होणार विविध कार्यक्रम








निंभोरा बुद्रूक, ता.रावेर, जि.जळगाव : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष हिवाळी शिबिर दत्तक वस्ती धामोडी, ता.रावेर येथील जि. प. मराठी शाळेत २२ ते २८ डिसेंबर दरम्यान आयोजित केले आहे. ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भागवत पाटील अध्यक्षस्थानी होते. जि. प. मराठी शाळेतील विद्यार्थी मयंक कोळी याच्या हस्ते उद्घाटन झाले.
शिबिरानिमित्ताने विविध कार्यक्रम होत आहेत. त्यात ग्रामस्वच्छता, जल व्यवस्थापन, अंधश्रद्धा निर्र्मूलन, व्यसनमुक्ती, उर्जाबचत, डिजिटल साक्षरता या उपक्रमांचा समावेश आहे. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, मोबाइल बँकिंग, जातीमुक्त भारत, पर्यावरण संवर्धन, सौर उर्जेचा वापर, ग्राम विकासात युवकाची भूमिका, बेटी बचावो बेटी पढाव, अवयव दान जनजागृती, सोशल मीडियाचा तरुणांवर होणारा परिणाम, आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय शिक्षण हक्क कायदा अशा विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.
प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने, ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक, पोलीस पाटील दत्तात्रय पाटील, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील, धामोडी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर.एच.सपकाळे कार्यक्रमास उपस्थित होते. शिबिर आयोजनासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. सतीश वैष्णव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. जयंत नेहेते, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.नीता वाणी तसेच प्राध्यापक वृंद आणि रासेयो स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.

Web Title: Special Winter Campus at Rhesio at Dhamdi in Raver Taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.