यावल तालुक्यातील मोहमांडली येथे रासेयोचे विशेष हिवाळी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 04:28 PM2019-01-05T16:28:31+5:302019-01-05T16:29:29+5:30

मोहमांडली येथे धनाजी नाना महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर झाले.

The special winter campus of Rosaceo at Mohamandali in Yaval taluka | यावल तालुक्यातील मोहमांडली येथे रासेयोचे विशेष हिवाळी शिबिर

यावल तालुक्यातील मोहमांडली येथे रासेयोचे विशेष हिवाळी शिबिर

googlenewsNext
ठळक मुद्देशिबिरात विविध उपक्रमशिबिरामुळे कला-गुणांना मिळतो वाव

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : मोहमांडली येथे धनाजी नाना महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर झाले.
अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी होते. प्रमुख पाहुणे उपसरपंच उगाबाई उखर्दू तडवी, मुख्याध्यापक रवींद्र कुमावत, रहेमान तडवी सदस्य, पोलीस पाटील रमजान तडवी तसेच यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रहिमत हसन तडवी, अरुण शिकारी पावरा हे विद्यार्थी, मुख्याध्यापक सुधाकर झोपे, दिलीप चौधरी, प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी, प्रा.डॉ.एस.एल.बिºहाडे व्यासपीठावर उपस्थित होते.
रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ एस. एल.बिरºहाडे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र कुमावत यांनीही आपल्या स्वयंसेवकामुळे माझ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना अधिक फायदा झाल्याचे समाधान व्यक्त केले. प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांनी स्वयंसेवकांनी येथील आदिवासी जीवनाशी एकरूप होऊन त्यांच्या जीवन व संस्कृतीशी विद्यार्थांनी एकरूप होऊन त्यांच्या आदर्श मूल्यांची जोपासना करावी, असे मत व्यक्त केले.
शिरीष चौधरी यांनी स्वयंसेवकांच्या सहभागाबद्दल कौतुक करताना मूल्यसंस्काराबरोबर श्रमसंस्काराची गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्रत्येक विद्यार्थ्यांनी येथील आदिवासी जीवनाचा जवळून अभ्यास करावा व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन केले.
सूत्रसंचालन प्रा.डॉ.सरला तडवी यांनी केले, तर आभार प्रा.डॉ.रवी केसुर यांनी मानले. शिबिर यशस्वीतेसाठी विद्यापीठ प्रतिनिधी स्वप्नील चौधरी, गणेश चौधरी, गौरव कोळी, प्राजक्ता काचकुटे व अशरद यांनी परिश्रम घेतले.

Web Title: The special winter campus of Rosaceo at Mohamandali in Yaval taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.