लोंढ्रीतांड्याच्या शेतातील चाऱ्याचे नमुने पुण्याच्या प्रयोग शाळेत जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 08:13 PM2019-12-09T20:13:32+5:302019-12-09T20:14:09+5:30
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अविनाश इंगळे यांनी लोंढ्री तांडा येथे भेट देऊन पाहणी केली. संबंधित शेतातील चाºयाचे नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी घेण्यात आले.
पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अविनाश इंगळे यांनी लोंढ्री तांडा येथे भेट देऊन पाहणी केली. संबंधित शेतातील चाºयाचे नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी घेण्यात आले. दरम्यान, सोमवारी पहाटे आणखी तीन जनावरे दगावली आहेत. यामुळे आता मृत जनावरांची संख्या आता २६ झाली आहे.
जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अविनाश इंगळे यांनी सोमवारी बाधित जनावरांची पाहणी करून पहूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.जयलाल राठोड यांच्यासह शेतकºयांकडून माहिती जाणून घेतली. बाधित जनावरांना चारण्यात आलेल्या संबंधित शेताची त्यांनी पाहणी केली आहे. याच शेतातील चाºयाचे नमुने घेण्यात आले आहे. हा नमुना रोग अन्वेषण पशुसंवर्धन विभाग पुणे येथील प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे. बाधित जनावरे दहा ते पंधरा गंभीर आहेत.
मृत जनावरे
सोमवारी हिवरसिंग राठोड, दीपक हंसराज व सुरेश राघो चव्हाण यांच्या प्रत्येकी एका बैलाचा मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत मृत गुरांची संख्या २६ झाली आहे.