२३ किमीच्या बायपास कामाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:15 AM2020-12-24T04:15:38+5:302020-12-24T04:15:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून गेलेल्या महामार्गावरील वाहतुकीचा भार कमी व्हावा, यासाठी महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातून गेलेल्या महामार्गावरील वाहतुकीचा भार कमी व्हावा, यासाठी महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला असून, पाळधी ते तरसोदपर्यंत होणाऱ्या २३ किमीच्या बायपास कामाला गेल्या महिनाभरापासून गती प्राप्त झाली आहे. बायपाससह गिरणा नदीपात्रावर देखील नवीन पूल तयार केला जाणार असून, या पुलाच्या कामालाही सुरुवात झाली आहे. बायपासच्या कामासाठी आव्हाणे, भोकणी शिवारात रस्त्यांचे रुंदीकरण करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
या भागातील बायपासच्या कामाला डिसेंबर २०१७ मध्ये सुरुवात झाली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे दोन वर्ो हे काम पूर्णपणे बंद झाले होते. अखेर महिनाभरापासून कामाला सुरुवात झाली आहे. पाळधी ते आव्हाणे शिवारापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण होऊन त्या ठिकाणी मुरूम व खडीने रस्त्याचा भराव टाकून तो दाबण्यात येत आहे. हाजीरा ते कोलकातादरम्यान येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. तरसोद ते फागणेपर्यंतच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, धुळे ते तरसोदपर्यंतचे काम काही वर्षांपासून थांबले होते, आता १८ महिन्यांत २३ किमीच्या बायपासचे काम पूर्ण करण्यावर मक्तेदाराचा भर आहे.
गिरणा पुलाची स्थिती
लांबी - ३२० मीटर
रुंदी - ३३ मीटर
खर्च अंदाजे - १०० कोटी
मक्ता - अॅग्रो इन्फ्रास्ट्रक्चर, इंदूर मध्यप्रदेश
मुदत - १८ महिने
बायपास
पाळधी ते तरसोदपर्यंत होणार बायपास
पाळधी-भोकणी-आव्हाणे-ममुराबाद-आसोदा-तरसोद शिवारातून जाणार बायपास
एकूण - २३ किमी
जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गावरील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल