शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या बाहेरील कामाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:16 AM2021-04-08T04:16:06+5:302021-04-08T04:16:06+5:30
कोरोनाबाबत रेल्वेतर्फे जनजागृती जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये मास्क वापरणे व सोशल डिस्टन्सिंगचे ...
कोरोनाबाबत रेल्वेतर्फे जनजागृती
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये मास्क वापरणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच रेल्वे स्टेशनवरील आसने दररोज निर्जंतूक करण्यात येत आहेत. प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बसविण्यात येत आहे.
केळकर मार्केटमध्ये अस्वच्छता
जळगाव : जिल्हा परिषदेजवळील केळकर मार्केटमध्ये साफसफाईअभावी अनेक ठिकाणी कचरा साचला आहे. यामुळे व्यावसायिकांना व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
महाराष्ट्र एक्स्प्रेसला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद
जळगाव : गेल्या आठवड्यापासून पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे. जळगावहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. तसेच रेल्वेपाठोपाठ पुण्याकडे जाणाऱ्या महामंडळाच्या बसेसलाही अल्प प्रतिसाद असल्याचे सांगण्यात आले.
चाळीसगाव मार्गावर शिवशाही बस सुरू करण्याची मागणी
जळगाव : सध्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सेवा बंद असल्यामुळे नागरिक महामंडळाच्या बसेसने पाचोरा व चाळीसगाव येथून ये-जा करित आहेत. मात्र, या मार्गावर साध्या बसेस चालविण्यात येत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी जळगाव आगार प्रशासनाने या मार्गावर वातानुकूलित शिवशाही बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.