समर्पण भावनेने सी.के.पाटलांनी शैक्षणिक संस्थेचे वटवृक्ष फुलवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 09:28 PM2019-08-03T21:28:39+5:302019-08-03T21:30:57+5:30

धरणगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक सी.के.पाटील यांच्या सेवापूर्तीनिमित्ताने संस्था व कर्मचाऱ्यांतर्फे गौरव व कृतज्ञता सोहळा शनिवारी पार पडला.

With a spirit of dedication, CK Patil swept the tree of educational institution | समर्पण भावनेने सी.के.पाटलांनी शैक्षणिक संस्थेचे वटवृक्ष फुलवले

समर्पण भावनेने सी.के.पाटलांनी शैक्षणिक संस्थेचे वटवृक्ष फुलवले

Next
ठळक मुद्देधरणगाव येथे कार्यक्रमसेवापूर्ती गौरव व कृतज्ञता सोहळ्यात मान्यवरांचे मत

धरणगाव, जि.जळगाव : विद्यार्थी चळवळीत काम करुन घडलेल्या सी.के.पाटील यांचे जीवन संघर्षमय राहिले. मात्र येणाऱ्याा प्रत्येक संघर्षाला संधी मानून त्यावर मात करुन प.पू.गो.गं.बाजपाई या शैक्षणिक संस्थेने लावलेल्या विद्यालयाच्या रोपट्याचे संगोपन करीत त्याचे वृटवृक्ष फुलविल्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते, असे गौरवमय उद्गार उपस्थित मान्यवरांनी सेवापूर्ती गौरव व कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डी.जी.पाटील होते.
येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक सी.के.पाटील यांच्या सेवापूर्तीनिमित्ताने संस्था व कर्मचाऱ्यांतर्फे गौरव व कृतज्ञता सोहळा शनिवारी पार पडला.
यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे आमदार डॉ.सुधीर तांबे, देवकर फाऊंडेशनचे संचालक विशाल देवकर, उमवि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डी.आर.पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष एच.जी.इंगळे, शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील, माजी अध्यक्ष आर.एच.बाविस्कर, गटशिक्षणाधिकारी अनिल बाविस्कर, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिºहाडे, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष एस.एस.पाटील, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक शरदकुमार बन्सी, सचिव मनोहर सूर्यवंशी, संचालक शैलेंद्र राणे, टीडीएफचे तालुकाध्यक्ष डी.एस.पाटील, ग.स.चे संचालक जीवन पाटील, संस्थेचे संचालक मोहन जैन, संचालक भरत पाटील, संचालक मच्छींद्र पाटील, ग.स.चे चेअरमन मनोज पाटील, रजनी व्ही.पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते, श्रीधर चौधरी, विलास पाटील, एरंडोल पतपेढीचे अध्यक्ष संदीप घुगे, आमदार दराडेंचे प्रतिनिधी हरीश मुंडे, एम.डी.पाटील, एस.के. पाटील, आर. टी. पाटील, संतोष भिला पाटील, युवराज बोरसे, राजधर टिकाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेतर्फे या सर्व मान्यवरांच्या हस्ते पर्यवेक्षक सी.के.पाटील यांच्या पत्नी सुरेखा पाटील यांच्यासह भेटवस्तू व शाल, श्रीफळ, मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातर्फे तसेच गावातील विविध संस्था, सामाजिक, राजकीय व्यक्तींनी स्वतंत्रपणे सत्कार केला.
प्रास्ताविक प्राचार्या सुरेखा पाटील यांनी केले. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, काँग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी.पाटील, संभाजी पाटील, एस.के.पाटील आदी मान्यवरांनी सी.के.पाटील एक संघर्षातून तयार झालेला शिक्षक संघटनेचा लढवय्या नेता असल्याचे स्पष्ट करुन भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्ती सी.के.पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना जीवनाचा इतिहास उलगडून सर्वाप्रती कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला.
याप्रसंगी एरंडोलचे विजय महाजन, रवींद्र महाजन, सुकलाल महाजन, विजय वाणी, ठेकेदार किरण पाटील, मुख्याध्यापक बळवंत पाटील आदी जिल्ह्यातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन डी.एम.पाटील, भारती बागुल, किरण चव्हाण, राजेंद्र पडोळ यांनी केले तर आभार जी.पी.चौधरी यांनी मानले. यशस्वितेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.

Web Title: With a spirit of dedication, CK Patil swept the tree of educational institution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.