बनावट दारूसाठी वापरण्यात येणारा स्पिरिटसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 10:27 PM2018-04-28T22:27:38+5:302018-04-28T22:42:30+5:30
चोपडा तालुक्यातील मोहरद पुलाजवळ केली अडावद पोलिसांनी कारवाई
आॅनलाईन लोकमत
अडावद ता.चोपडा,दि.२८- बनावट दारु बनविण्यासाठी वापरण्यात येणारे १२० लिटर स्पिरिट (इस्तरा) तसेच देशी दारु २८ रोजी सकाळी ११ वाजता अडावद पोलिसांनी मोहरद रोडवरील पुलाजवळ जप्त केली.
अडावद पोलिसांनी सकाळी १०-०० वाजता चोपडा-यावल रस्त्यावरील धानोरा पोलीस चौकीजवळ सापळा लावला. बँरिकेट लावलले दिसताच ओमनी क्रमांक एम.एच.१९. वाय. ०४७६ हिच्या चालकाने युटर्न घेतला. मोहरद रस्त्यावरील पुलाजवळ ओमनी सोडुन तस्करांनी केळीच्या शेतातुन धुम ठोकली. पोलीसांनी गाडी ताब्यात घेतली असता. गाडीत ३० हजार रुपये किंमतीचे नकली दारु बनविण्यासाठी वापरले जाणारे १२० लिटर स्पिरिट, २ हजार ४०० रुपये किंमतीची ४८ बाटल्या देशी दारु व दिड लाख रुपये किंमतीची काळी-पिवळी ओमनी असा सुमारे १ लाख ८२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अडावद पोलीसांनी हस्तगत केला. पोलीस शिपाई योगेश गोसावी यांच्या फिर्यादीवरून मोहन रामा चारण (रा.सांगवी ता.शिरपूर जि.धुळे,) दयाराम महारु बारेला (रा. मुळेअवतार ता. चोपडा,) जितेंद्र लालचंद सोनवणे (रा. वढोदा ता. यावल), प्रविण तुळशीराम अहिरे (रा.वढोदा ता. यावल, रघु धनगर रा.विरावली ता. यावल), फिरोज तडवी (रा. धानोरा ता. चोपडा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला.