अध्यात्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:20 AM2020-12-30T04:20:34+5:302020-12-30T04:20:34+5:30
जळगाव : संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा नामपर प्रकरणातील भगवंताचे नामसामर्थ्य सांगणारा असा हा गोड अभंग आहे. महाराज म्हणतात, जो ...
जळगाव : संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा नामपर प्रकरणातील भगवंताचे नामसामर्थ्य सांगणारा असा हा गोड अभंग आहे. महाराज म्हणतात, जो मुखाने हरि नामाचा सर्वकाळ उच्चार करतो, तो सर्व सुखाचा अधिकारी होतो. ज्या साधकाच्या मुखात नामाचे साधन आहे असा साधक हा श्रेष्ठ होतो. तुकाराम महाराज म्हणतात, की असा साधक हा विरळच आहे. महाराज प्रमाण देतात..
विरळा ऐसा कोणी, तुका त्यासी लोटांगणी, जो साधक नामाची साधना करतो, मुखाने सदा सर्वदा भगवंताचे स्मरण करतो, तो सर्व सुखांचा अधिकारी होतो.आता महाराजांनी पहिल्या चरणात, सर्व सुख हा शब्द संसारातील सुख या आशयाने नसून परमार्थ तत्त्व या आशयाने आला आहे, तर परमार्थमध्ये सुख या शब्दाचा अर्थ म्हणजे ब्रह्मसुख,आप्तसुख व मोक्ष सुख, अशा आशयाने घ्यायचा आहे. महाराज म्हणतात जो साधक नामाची साधना सदासर्वकाळ करतो. तो परमार्थ तत्त्वाच्या आशेने सुखी होतो. अशाप्रकारे महाराजांनी नामाचा महिमा सांगितला आहे.