आध्यात्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:15 AM2021-02-15T04:15:40+5:302021-02-15T04:15:40+5:30
आध्यात्म जळगाव : प्रभू येशू ख्रिस्त ‘एक अध्यात्मिक गुरू थोर समाजसेवक’ देखील होते. त्यांच्या समकालीन समाजसुधारकांनी जेवढा सामान्यांसाठी पुढाकार ...
आध्यात्म
जळगाव : प्रभू येशू ख्रिस्त ‘एक अध्यात्मिक गुरू थोर समाजसेवक’ देखील होते. त्यांच्या समकालीन समाजसुधारकांनी जेवढा सामान्यांसाठी पुढाकार घेतला नसेल,तेवढा सक्रिय सहभाग प्रभू येशूचा पाहावयास मिळतो.
प्रभू येशूचे समाजकार्य खालीलप्रमाणे विभागता येईल-
समाजातील विषमता मिटवणे, स्रींयासाठी समान न्याय,
बालशिक्षण, समाज प्रबोधन व शिक्षण, धार्मिक कट्टरतेचा विरोध, आरोग्य व समाजात जनजागृती व अध्यात्मातून समाजात शांती प्रस्थापित करणे.
आजपासून २००० हजार वर्षापूर्वी उच्च-नीच हा भेद टोकाला पोहचला होता. शमरोनी लोक हे दलित वर्गवारीत मोडत,तर येशू यहूदी जातीचे म्हणजे उच्च जातीच्या वर्गात मोडत. अशा प्रसंगी प्रभू येशूने एका यहूदी स्रीला पाणी पिण्यासाठी मागितले. लहान बालकांची तेव्हा यज्ञात आहती देणे सहज व समाजमान्य होते,तेव्हा तो म्हणतो ''बालकास मजकडे येऊ द्या,त्यास मना करू नका, एक स्री जेव्हा रंगेहाथ पाप करताना पकडली जाते.तेव्हा तो म्हणतो,ज्याने कधीच पाप केलं नाही त्पाने पहीला दगड मारावा, परूशी लोकं हे कट्टर धार्मीक म्हणून ओळखले जायजे. ते नेहमी येशूला कचाट्यात पकडण्यासाठी नाना प्रश्न विचारीत..तेंव्हा येशू त्यांना फार सांभाळून उत्तर देई वा त्यांना प्रतिप्रश्न विचारून गप्प बसवी. तो अनेकदा धार्मिक पुढाऱ्यांना कान उघडणी करतांना दिसतो.
त्याने अनेकांना आरोग्य दिले कुष्ठरोगी बरे करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. आपल्या प्रवचनातून. समानता, बंधुत्व, दया, प्रेम, शांती, नम्रता व आज्ञाधारकता ह्यावर अधीक भर दिलेला आढळतो.
प्रभू येशूचे डोंगरावरील प्रवचन, वधस्तंभावरील अखेरचे वाक्य हे जगप्रसिद् आहे!
प्रभू येशू हा केवळ सामाजीक पुढारी नव्हता तर मार्ग, सत्य व जीवन होता. व आमचा विश्वास आहे की तो आम्हाला घेण्यासाठी परत येणार आहे. येशूची सुवार्ता सर्वांसाठी आहे. तो म्हणत असे की, ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको. त्या सुवार्तेवर विश्वास ठेवायचा की नाही, तिचा स्वीकार करायचा की नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. आणि म्हणून ती सुवार्ता सर्व जगाला सांगत राहण्याची जबाबदारी प्रभू येशूच्या शिष्यांची आहे. ‘तुम्ही सर्व जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्ता सांगा, ही येशूची त्यांना शेवटची आज्ञा होती.