कासोद्यात शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद : महिलांचाही सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 05:43 PM2021-07-03T17:43:23+5:302021-07-03T17:44:11+5:30
लोकमतचे संस्थापक संपादक कै.जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त २ रोजी कासोद्यातदेखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कासोदा,ता.एरंडोल : लोकमतचे संस्थापक संपादक कै.जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त २ रोजी कासोद्यातदेखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ५७ जणांनी रक्तदान केले.
येथील बालाजी मंदिराच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच महेश पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भैय्या राक्षे, डॉ.पी.जी.पिंगळे, माजी जि.प.सदस्या महानंदा पाटील, ए.पीआय रविंद्र जाधव, सेनेचे तालुका उपप्रमुख रवींद्र चौधरी, भास्कर चौधरी, कैलास अग्रवाल, स्वप्नील बियाणी, अजीज बारी, नाजीम अली, मुश्रीफ पठाण, आसीफ मन्यार, डॉ.मोतीलाल पाटील, सरीता मंत्री, डॉ. टावरी, शितल मंत्री, सुनील झंवर, रुपेश सोनवणे, बंटी चौधरी इत्यादी उपस्थित होते.
रेडक्रॉस रक्तपेढीचे डॉ.शंकरलाल सोनवणे, टी.आर.जोशी, किरण बाविस्कर, मंगेश ओतारी, दिशा पाटील, अन्वर खान यांनी रक्त संकलन केले.प्रास्ताविक प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी केले तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश अग्रवाल, शितल मंत्री, डॉ.पी.जी.पिंगळे, मधूकर ठाकूर, सुनील झंवर, डॉ .जगदीश समदाणी, कैलास अग्रवाल, भास्कर चौधरी, स्वप्नील बियाणी, कैलास , शैलेश पांडे यांचे सहकार्य लाभले . या अभियानात येथील दोन भगिनींनी देखील सहभाग नोंदवून रक्तदान केले. हे विशेष.