बोदवडमध्ये ‘जनता कर्फ्यू’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 16:25 IST2020-09-19T16:25:07+5:302020-09-19T16:25:24+5:30
‘कोरोना’ विषाणूचा कहर रोखण्यासाठी प्रशासनासह विविध घटकांनी स्वयंस्फूर्तीने पुकारलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला पहिल्या दिवशी शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बोदवडमध्ये ‘जनता कर्फ्यू’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
बोदवड : ‘कोरोना’ विषाणूचा कहर रोखण्यासाठी प्रशासनासह विविध घटकांनी स्वयंस्फूर्तीने पुकारलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला पहिल्या दिवशी शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येने अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात १६ रोजी गांधी चौकात व्यापारी, पोलीस प्रशासन, नगर प्रशासन, महसूल विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. त्यात बोदवड शहरात दि.१९ व २० सप्टेंबर असे दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’ची हाक देण्यात आली होती. त्याला आज पहिल्या दिवशी १९ रोजी ुउत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात मेडिकल, दूध व वैद्यकीय सुविधा वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद होती.
अधूनमधून पोलीस, महसूल व नगरपंचायतीचे पथक शहरात गस्त घालत होते.
शहरात पुकारलेल्या बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट होता, रस्त्यावर वाहतूकही दिसून आली नाही.