‘लोकमत’च्या महायज्ञात विविध संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:12 AM2021-07-12T04:12:22+5:302021-07-12T04:12:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लोकमत रक्ताच नातं या महायज्ञात रविवारी जळगाव तालुक्यात सात ठिकाणी रक्तदान शिबिर झाले. यावेळी ...

Spontaneous response from various organizations known as ‘Lokmat’ | ‘लोकमत’च्या महायज्ञात विविध संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘लोकमत’च्या महायज्ञात विविध संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : लोकमत रक्ताच नातं या महायज्ञात रविवारी जळगाव तालुक्यात सात ठिकाणी रक्तदान शिबिर झाले. यावेळी ७८३ दात्यांनी रक्तदान करीत या शिबिरात सहभाग नोंदविला.

शिरसोलीत २६ जणांचे रक्तदान

शिरसोली येथे ग्रामपंचायत शिरसोली प्र.न. व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २६ दात्यांनी रक्तदान केले. शिबिराला माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेचे माजी संचालक वाल्मीक पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, पं.स.चे माजी सभापती नंदलाल पाटील, शिरसोलीचे सरपंच हिलाल भिल्ल, उपसरपंच श्रावण ताडे, ग्रा.पं.सदस्य रामकृष्ण काटोले, श्याम बारी, मिठाराम पाटील, वासुदेव बोरसे, महेंद्र सोनवणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. शिबिरासाठी गोदावरी रक्तपेढीचे डाॅ.नितीन भारंबे, लक्ष्मण पाटील यांच्यासह सहकार्यांनी परिश्रम घेतले. यशस्वीतेसाठी बापू पवार, वसंत पाटील, समाधान निकुंभ यांनी परिश्रम घेतले.

सिंधी पंचायतीच्या शिबिरास प्रतिसाद

लोकमत व जळगाव शहर पूज्य सिंधी पंचायतीतर्फे झुलेलाल सभागृहात रक्तदान शिबिर झाले. सकाळी साडेदहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी महापौर जयश्री महाजन, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी, सिंधी पंचायतीचे अध्यक्ष शीतलदास जवाहरानी, उपाध्यक्ष मुकेश टेकवाणी, उपाध्यक्ष गुलाब चुघरा, सचिव कमलेश वासवानी, खजिनदार प्रदीप आहुजा, मार्गदर्शक माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी, प्रोजेक्ट चेअरमन नारायण मंगलाणी, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक रवी टाले, सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी, नंदू अडवाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती. घनश्याम अडवाणी, राजेश जवाहरानी, भरत रुंगठा, अशोक रुपचंदानी, घनश्याम रुंगठा, जितेंद्र रायसिंगानी, जयकुमार बागवाणी, अमित भागदेव, सुनील कुकरेजा, दीपककुमार भोजवाणी, मनोज केसवाणी आदींनी परिश्रम घेतले.

दीडशे वेळा केले रक्तदान...

प्रदीपकुमार होतचंदाणी यांनी आतापर्यंत दीडशेवेळा रक्तदान केले आहे. आपला रक्तगट हा ओ निगेटिव्ह असून, तो अगदी कमी लोकांचा असतो. या रक्तगटात रक्त उपलब्ध होण्यास अडचणी होतात. मात्र, जेव्हा जेव्हा गरज पडली, तेव्हा आपण रक्तदानासाठी गेलोय. रक्तदानाने मला नेहमीच ताजेतवाने वाटते, अगदी अर्ध्या तासात आपण फ्रेश होतो. तेव्हा न घाबरता सर्वांनी रक्तदान करावे, असा सल्ला त्यांनी जनतेला दिला आहे.

लमांजन येथे आठ दात्यांचे रक्तदान

शिरसोली येथून जवळच असलेल्या लमांजन येथे लोकमत व शीतल चिंचोरे विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने लमांजन, कुऱ्हाडदे व वाकडी ग्रुप ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर झाले. यावेळी सतीश सूर्यवंशी, विजय पाटील, जिवेश चिंचोरे,रवींद्र पाटील, योगेश पाटील, अमिन खाटीक,विक्की सोनवणे, हितेश शिवदे व शीतल चिंचोरे उपस्थित होते.

जनमत प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर

बेंडाळे महाविद्यालयासमोरील कोटा क्लास येथे लोकमत व जनमत प्रतिष्ठानतर्फे रक्तदान व विनामूल्य अँटिजेन तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी ७ बॅग रक्तसंकलन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरिता कोल्हे-माळी होत्या. शिबिराचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी पोलीस सेवा महिला संघटना जिल्हाध्यक्षा हर्षाली पाटील व प्रतिभा मेटकर, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांची उपस्थिती होती. शिबिरात सात बॅग रक्तसंकलन करण्यात आले. सूत्रसंचालन विजय लुल्हे यांनी केले. शिबिरास राहुल कोळी, सागर कोळी, राजेंद्रकुमार वर्मा,संजयकुमार सिंग, विजय पाटील आदींची उपस्थिती होती. आभार प्रदर्शन संतोष भारंबे यांनी मानले.

फोटो कॅप्शन १) : पूज्य सिंधी पंचायत येथे प्रियंका जवाहरानी यांनी प्रथम रक्तदान केले. यावेळी उपस्थित प्रदीप आहुजा, घनश्याम अडवाणी, मुकेश टेकवाणी, डॉ.गुरुमुख जगवाणी, महापौर जयश्री महाजन, शीतलदास जवाहरानी, नारायण मंगलाणी, राजेश जवाहरानी, नंदू अडवाणी आदी.

२) शिरसोली येथे रक्तदान करताना एकनाथ पाटील. सोबत मिठाराम पाटील, श्रावण ताडे, हिलाल भिल्ल, रामकृष्ण काटोले, शेनफडू पाटील, डाॅ.नितीन भारंबे, नंदलाल काटोले, भगवान सोनार आदी.

Web Title: Spontaneous response from various organizations known as ‘Lokmat’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.