धरणगावचे क्रीडा संकुल धूळखात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 06:31 PM2020-10-12T18:31:42+5:302020-10-12T18:33:15+5:30
निधीअभावी क्रीडासंकुलाचे काम रखडले आहे.
धरणगाव : निधीअभावी क्रीडासंकुलाचे काम रखडले आहे. ९५ लाख रुपये खर्च करूनही त्याचा उपयोग होत नसल्याची क्रीडाप्रेमींची शोकांतिका आहे.
२०१० मध्ये या क्रीडासंकुलाच्या कामास मंजुरी मिळाली आणि तेव्हाच कामास सुरुवात झाली. साधारण दोन वर्षे काम सुरू होते.
धरणगाव चोपडा रस्त्यावर हे क्रीडा संकुल १२ एकर जागेत बांधण्यात आले आहे. यासाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. यातील ९५ लाख रुपये खर्च झाले. परंतु काम पूर्ण झाले नाही. कुस्ती, हँडबॉल, खोखो, हॉलिबॉल असे काही खेळ येथे होऊ शकतात.
आजच्या स्थितीत येथील दरवाजे-खिडक्या गायब झालेल्या असून, आत आंबटशौकिनांचा वावर दिसतो. तसेच गुरे-ढोरेही या क्रीडासंकुलात चरताना दिसतात.
आजच्या स्थितीत पाच लाख रुपये निधी मिळालेला असला तरी प्रत्यक्षात १५-२० लाख रुपये निधी क्रीडासंकुलाच्या बांधकामासाठी लागू शकतो. निधी उपलब्ध झाल्यानंतरच कामास सुरुवात होणार आहे.
ठिकाणी विविध खेळांच्या बाबतीत धरणगाव तालुक्याने राज्यस्तरीय दिले आहेत. त्यात कुस्ती, हॉलिबॉल, फुटबॉल, डॉजबॉल आदी खेळांचा समावेश आहे. यासाठी या क्रीडासंकुलाचे बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी क्रीडाप्रेमींनी केली आहे.
दोन महिने अगोदर तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पालकमंत्री, क्रीडाधिकारी यांची बैठक झाली. त्यात अपूर्ण काम पूर्ण करण्याविषयी बांधकाम विभागाला आदेश देण्यात आला आहे. निधीचा प्रस्ताव शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. बांधकाम पूर्ण करून क्रीडा दिनी क्रीडा संघाकडे क्रीडासंकुल वर्ग करण्यात यावे, अशी मागणी पालकमंत्री, तहसिलदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली होती.
- मिलिंद दीक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव