फैजपूरला जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 04:02 PM2020-01-13T16:02:51+5:302020-01-13T16:03:14+5:30
जे.टी. महाजन इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दोन दिवसीय क्रीडा महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे घेण्यात आला.
फैजपूर, जि.जळगाव : जे.टी. महाजन इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दोन दिवसीय क्रीडा महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे घेण्यात आला. आॅलम्पिक सामन्यांच्या पारंपरिक धर्तीवरच स्व.जे.टी. महाजन यांच्या स्मारकासमोरून इंजिनिअरिंग कॉलेजच्या आवारात मशाल पेटवून दहावीच्या विद्यार्थ्यांव्दारा धावत व एक-दुसऱ्याला सोपवत ती शाळेत आणली गेली. यानंतर मसाका अध्यक्ष शरद महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
प्राचार्य मोझेस जाधव यांनी प्रास्ताविक केले.
टीएमई सोसायटीचे संचालक प्रभाकर सरोदे, सचिव व्ही.आर.झोप आदींनी मार्गदर्शन केले.
मैदानी खेळांमध्ये वैयक्तिक व सांघिक स्वरूपात विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यात कबड्डी, क्रिकेट, हॉलीबॉल, धावणे, लिंबू चमचा, पुस्तक स्थैर्य, बेडूक उड्या उलट धाव आदी खेळ क्रीडाशिक्षक विश्वजय राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यंदा पथसंचलन प्रमुख म्हणून विद्यार्थी अनिकेत जैतकरने जबाबदारी पार पाडली. कला शिक्षिका वैशाली किरंगे व त्यांच्या सहाय्यक गटाने फलक चित्रणातून क्रीडेला एक वेगळा आयाम देत खेळाचे महत्व दर्शवणारे फलक चित्रण केले.
प्रतिवर्षाप्रमाणे घेण्यात येणाºया प्रिन्सिपल चषक क्रिकेट स्पर्धेत इयत्ता दहावीतील विद्यार्थी कॅप्टन अफताब शेख याच्या संघाने बाजी मारली. याच स्पर्धेत सर्वोच्च फलंदाज म्हणून अफताब शेख, सर्वोच्च गेंदबाज म्हणून संकल्प लोधी तर एकूण खेळीत विद्यार्थी सिद्धेश पाटीलने चषक स्पर्धा वीर खेळाडूचा किताब पटकावला.
सूत्रसंचालन शिक्षक ईश्वर चौधरी यांनी केले. प्राचार्य नंदकिशोर सोनवणे, पर्यवेक्षिका पूनम नेहेते आदींनी परिश्रम घेतले.