जोडीदार कोणत्याही समाजाचा चालेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 10:05 PM2020-02-03T22:05:45+5:302020-02-03T22:05:54+5:30
परिचय मेळावा : भंडारा येथून आलेल्या युवतींनी व्यक्त केली अपेक्षा
जळगाव : विवाहासाठी जोडीदार कोणत्याही समाजाचा चालेल फक्त तो निर्व्यसनी असावा. शेतकरी जोडीदारही चालेल, अशा अपेक्षा भंडारा येथून आलेल्या युवतींनी रविवारी आयोजित परिचय मेळाव्यात व्यक्त केल्या. त्यावेळी उपस्थितही आवक झाले.
तोताराम महाराज नवचैतन्य लेवा पाटीदार समाज मंडळ जळगावतर्फे शेतकरी, व्यावसायिक व नोकरदारांसाठी रविवारी बाबा हरदासराम मंगल कार्यालयात युवक-युवती परिचय मेळावा झाला. त्यावेळी या मेळाव्यात भंडारा येथील विविध समाजाच्या मुलीही उपस्थित होत्या. मंडळातर्फे उपवर मुली व त्यांच्या पालकांनाच निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी मेळाव्यात आपला परिचय करुन दिला. त्यावेळी वरीलप्रमाणे अपेक्षा व्यक्त केल्या. विशेष म्हणजे असा परिचय मंचावरुन करुन देणाऱ्या बहुतांश मुली उच्च शिक्षित होत्या.
जळगाव जिल्ह्यात जवळपास सर्वच समाजात विदर्भातून मुली सुना म्हणून आणल्या जात आहेत. परंतु यात काही मध्यस्थी करत असतात. असे विवाह जोडणे काही जणांचा व्यवसायच झालेला आहे, असे मत मान्यवरांनी मांडले.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, राजेंद्र राणे, यतीन ढाके, धनराज महाराज, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ जळगावचे रामभाऊ पवार, संजय मराठे, उज्ज्वल चौधरी, लालजी पाटील, अशोक पाटील, अॅड. प्रकाश पाटील, प्रल्हाद भारंबे,अमर शहीद संत कवराम ट्रस्ट जळगाव , समाजाच्या विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच भंडारा येथील हरिश्चंद्र बांडेबुचे, देविदास सूर्यवंशी, कार्तिक लांजेवार, अमित उरफुडे, कुंवरलाल बहेकर यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते वधू-वर सूचीचे प्रकाशन करण्यात आले.
यशस्वीतेसाठी मणिकर्णिका महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक मंडळ, युवक मंडळ , शक्ती महाजन, शशिकांत फेगडे, किशोर कोलते, निता वराडे, पूनम सावदेकर, सीमा फेगडे, वैशाली बºहाटे, वैष्णवी भंगाळे, प्रशांत महाजन, अर्चना भंगाळे, शिशीर भंगाळे, कविता कोलते, मयूर लोखंडे, माधुरी लोखंडे, होमाजी भंगाळे, वसंत कोलते, योगेश फेगडे, स्वप्निल खडसे यांसह समाजबांधवांनी परिश्रम घेतले.
या मेळाव्यास जळगाव जिल्ह्यासह, नाशिक, मुंबई, पुणे, जालना, औरंगाबाद, निपाणा , मलकापूर, सुरत, वापी, इंदूर आदी ठिकाणाहून समाजबांधव आले होते.