शिक्षकाच्या बदली रद्दसाठी पालकांचा प्राचार्याना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2017 04:57 PM2017-06-20T16:57:24+5:302017-06-20T16:57:24+5:30

कळमसरे गावात तब्बल दोन तास सुरू होता गोंधळ

Spread the guardian's teacher for the cancellation of a teacher | शिक्षकाच्या बदली रद्दसाठी पालकांचा प्राचार्याना घेराव

शिक्षकाच्या बदली रद्दसाठी पालकांचा प्राचार्याना घेराव

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत 

कळमसरे,दि.20 - येथील कळमसरे विद्या प्रसारक संस्थेतील सुरेश फाफला पवार या शिक्षकाची बदली रद्द करा अन्यथा आमच्या पाल्यांना शाळेत पाठविणार नाही अशा आशयाचे निवेदन देण्यावरुन मंगळवार 20 रोजी सकाळी पालकांनी शाळेतील प्राचार्य व संस्था चालकांना घेराव घातला. या प्रकरणी येत्या 25 रोजी होणा:या सभेत बदली विषयावर निर्णय घेतला जाईल, असे सांगितल्यानंतर दोन तासानंतर शांतता झाली. 
शाळेचे प्राचार्य पी.पी.पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2016-17 संच मान्येतत कळमसरे शाळेत 25 शिक्षक मंजूर असताना 27 शिक्षक कार्यरत असल्याने दोन शिक्षक अतिरिक्त ठरत होते. तर  संस्थेच्या किनोद शाळेत 18 शिक्षक मंजूर असताना 16 शिक्षक कार्यरत होते. यात एक प्रशिक्षित पदवीधर व दुसरा एच.एस.सी.डी.एड्. असे दोन शिक्षकांची पदे रिक्त होती. शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प.जळगाव यांच्या आदेशाने संस्था पातळीवर समायोजनसाठी 16 डिसेंबर 2016 रोजी झालेल्या सभेत डी.एड्. मधून सुरेश पावरा व प्रशिक्षित पदवीधरमधून किशोर सोनवणे यांची बदली करण्यात येवून ते 16 डिसेंबर 16 पासून किनोद शाळेत रुजू झालेले आहे. त्यांचा पगारदेखील किनोद शाळेतून ते घेत आहेत. परंतु 15 जून 17 पासून शाळा सुरु झाल्याने सुरेश पावरा हे किनोद येथे जाण्यासाठी तयार नव्हते. 
पावरा चांगले शिकवितात, त्यांची बदली रद्द करा असे पालकांचे म्हणणे होते. पावरा यांची बदली रद्द होत नाही, तोर्पयत आम्ही मुलांना शाळेत पाठविणार नाही. तोर्पयत शाळा बंद राहील, अशी घोषणाबाजी करुन, काही  पालक व माजी विद्याथ्र्यानी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ विद्याथ्र्याना एकत्र करीत जोरदार घोषणाबाजी सुरु केली. जमावातून काहींनी शाळेच्या फळ्यावर, गावातील फळ्यावर रस्त्यावर ‘चार दिवस शाळा बंद’ची फलकबाजी केली. 
25 जून रोजी चेअरमन आल्यानंतर संचालक मंडळाची सभा बोलावून त्या सभेत सुरेश पावरा यांच्या बदली विषयावर निर्णय घेतला जाईल असे प्राचार्य पाटील, संचालक यादव चौधरी, दीपचंद छाजेड, योगेंद्रसिंग राजपूत यांनी जमावाला सांगितल्यानंतर तब्बल दोन तासानंतर शांतता झाली.

Web Title: Spread the guardian's teacher for the cancellation of a teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.